लोकदर्शन मुंबई-👉गुरुनाथ तिरपणकर
समाजासाठी आपण मण भर नाही,तर कण भर आपले समाजाप्रती दायित्व म्हणून कार्य करणे हे जनजागृती सेवा संस्था करत असते.विविध क्षेत्रात ही संस्था कार्यरत आहे.पत्रकारांचा सन्मान हा त्याचाच एक भाग आहे.६जानेवारी रोजी महाराष्ट्रात पत्रकार दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.त्याच अनुषंगाने जनजागृती सेवा संस्थेच्यावतीने महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाच्या पदाधिका-यांना संस्थेच्या वतीने डायरी,भेटवस्तू,गुलाबपुष्प व सन्मानपत्र प्रमुख पाहुणे सेवा निवृत्त तहसीलदार रमेश राणे यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करुन गौरविण्यात आले.महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असल्या कारणाने त्यांचा हा कौतुक सोहळा नुकताच मेघवाडी,लालबाग येथे संपन्न झाला.यावेळी महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटकर,वरळी येथील कामत हाॅटेलचे मालक जगन्नाथ कामत,कवी डाॅक्टर ख.र.माळवे जेष्ठ पत्रकार व कवी शशिकांत सावंत,शासकीय सेवानिवृत्त अधिकारी प्रकाश तोडणकर,एडवोकेट सुनिल शिर्के,वसंतराव नाईक प्रतिष्ठाचे कार्यकारी अधिकारी शशिकांत तुळवे,महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाचे जेष्ठ सल्लागार प्रभाकर(आप्पा)तोडणकर,पत्रकार आण्णासाहेब आहेर,यांचा सेवा निवृत्त तहसीलदार रमेश राणे व जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करुन गौरविण्यात आले.उपस्थित सर्वांनी जनजागृती सेवा संस्थेला भविष्याच्या वाटचालीस शुभेच्छा देऊन संस्थेचे अध्यक्ष,पत्रकार गुरुनाथ यांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाचे सल्लागार प्रभाकर(आप्पा)तोडणकर,मुक्त पत्रकार संघाचे जगन्नाथ कामत यांचे विशेष सहकार्य लाभले.अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.