लोकदर्शन फुलचिंचोली 👉राहुल खरात
क्रांतीज्योती सावित्री माता व राजमाता जिजाऊ माँसाहेब संयुक्त जयंती उत्सव2025 अखंड मानवतेसाठी कार्य करणाऱ्या या दोन महातेजस्विनी क्रांती नायिकांची जयंती पुणे येथे साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने अखंड मानवता राज्यस्तरीय पुरस्कार या पुरस्काराचे पुणे या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत वितरण करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
फुलचिंचोली (ता.पंढरपूर) येथील दै. पंढरी भूषण चे पत्रकार सावता नामदेव जाधव यांना पत्रकार क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झाला आहे. मानवतावादी बहुउद्देशीय मंडळाच्या अध्यक्ष सौ सुरेखा भालेराव नागटिळक यांनी ही माहिती दिली आहे.लेखिका तथा राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ दीपा श्रावस्ती यांच्या शुभहस्ते तर इतिहास अभ्यासक, सुप्रसिद्ध वक्ते डॉ.श्रीमंत कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली व संपादक चालू घडामोडी देवा जाधवर, ज्येष्ठ साहित्य अभ्यासक सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार असल्याचे सौ सुरेखा भालेराव-नागटिळक यांनी सांगितले. पत्रकार सावता जाधव हे ग्रामीण भागातील पत्रकार असून त्यांनी आजपर्यंत रस्ते शेतकऱ्यांचे प्रश्न आधी प्रश्नावर आवाज उचलण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामीण भागात एक तळमळीने काम करणारे पत्रकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून हा त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या अगोदरही त्यांना सहा पुरस्कार प्राप्त झाले आहेत .त्यांच्या हा सन्मान होत आहे त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.