लोकदर्शन 👉मोहन भारती
राजुरा – गोंडवाना विद्यापीठात गडचिरोली अधिसभा (सिनेट) दिनांक २४ डिसेंबर २०२४ व दिनांक ८ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झाली. या अधिसभेत बाब क्रं.४ अन्वये अधिसभा सदस्यांनी सादर केलेले प्रस्तावावर चर्चा करण्यात आली.
सिनेट तथा व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय गोरे यांनी “क्रांतिवीर बिरसा मुंडा नैसर्गिक संसाधन संवर्धन अध्यासन केंद्र ” सुरू करण्याचा प्रस्ताव अधिसभेत मांडला . या प्रस्तावाला गुरुदास कमडी,डॉ.विवेक गोरलावार, प्रशांत दोंतुलवार, डॉ.दिलीप चौधरी,डॉ.मिलिंद भगत यांनी अनुमोदन दिले.मान्यवर सदस्यांच्या तुरळक दुरुस्ती सूचनेनुसार प्रस्ताव मान्य करण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचा 15 नोवेंबर हा जन्मदिवस पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जनजाती गौरव दिवस म्हणून घोषित केला आहे. क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचे हे वर्ष 150 वी जयंती निमित्त शतकोत्तर जयंती साजरी करीत आहे बिरसा मुंडा एक महान भारतीय आदिवासी स्वतंत्रता सेनानी व मुंडा जनजातीचे जननायक होते त्यांनी ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध आदिवासी सहस्त्र बंदी धार्मिक आंदोलनाचे नेतृत्व केले हे आंदोलन भारतीय इतिहासात महत्त्वपूर्ण मानले जाते. जल,जंगल, जमीन या नैसर्गिक संसाधनाच्या संवर्धन व सुरक्षा,नारी सुरक्षा तसेच आपला समाज व संस्कृती अबाधित राखण्यासाठी बिरसा मुंडा यांनी उलगुलान आंदोलन केले. मुंडा जनजातीचे लोकनायक म्हणून त्यांचा गौरव केला जातो. त्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षरात केला जातो याच पर्वावर हे अध्यासन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय गोरे यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेत सादर केला.
क्रांतिवीर बिरसा मुंडा यांनी आदिवासींच्या जमिनीवरील ब्रिटिश अधिकाराच्या विरोधात मुंडा जनजातीला ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढण्यास प्रेरित केले त्यांनी ब्रिटिश सत्तेला कमजोर करण्यासाठी आदिवासींना कोणत्याही प्रकारचे कर न भरण्याचे आवाहन केले यातून आदिवासींची एकजूट घडवून आणली बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध मुंडाराज चे फलक लावून गुरुला युद्ध अभियानाचे नेतृत्व केले.भारतीय आदिवासी म्हणूनच बिरसा मुंडा यांना भगवान मानतात. विविध कृतिशील कार्याच्या माध्यमातून त्यांनी आदिवासी व इतर समाजामध्ये जागृती घडवून आणली त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील एक महत्त्वपूर्ण स्वतंत्रता सेनानी म्हणून त्यांची ओळख आहे
क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या 150 वी जयंती निमित्त विद्यापीठ परिक्षेत्रात स्वातंत्र्य आंदोलन चळवळीतील साहित्य सांस्कृतिक वारसा यांचे संवर्धन व प्रसार करण्यासाठी त्याचप्रमाणे विविध समाजामध्ये राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि सांस्कृतिक वारसा यांचे जतन करण्यासाठी व विद्यापीठ परिक्षेत्रातील नैसर्गिक संसाधनाच्या संवर्धन व सुरक्षेसाठी त्यांच्या कार्याची प्रेरणा समस्त समाजाला देण्यासाठी हे अध्यासन सुरू करीत असल्याचा मनोदय सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.संजय गोरे यांनी केला आहे.