लोकदर्शन मुंबई 👉-गुरुनाथ तिरपनकर
आरोग्य क्षेत्रातील समाजकार्यची दखल घेऊन मैत्रेय फाउंडेशन, सायन ब्लड बँक ह्यांनी संस्थेच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमास मुंबई येथील लालबाग-परळ परिसरातील प्रसिद्ध समाजसेवक अमोल वंजारे ह्याना निमंत्रित करून, त्यांच्या सामाजिक कार्याची योग्य ती दखल घेऊन प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. ह्या प्रसंगी शिव आरोग्य सेना महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ.किशोर ठाणेकर, महाराष्ट्र उपाध्यक्ष मैत्री संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जयवंत गाडे सर, सिने कलाकार श्री. मिलिंद गवळी, शिव आरोग्य सेना पदाधिकारी, मैत्रय संस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद आदी सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.