मंत्री आदितीताई तटकरे यांनी घेतली परीक्षित ठाकूर यांची सदिच्छा भेट

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे

उरण :
मा. ना. कु. आदितीताई वरदा सुनिल तटकरे मंत्री, महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य यांनी शुक्रवार दिनांक १७/१/२०२५ रोजी रायगड जिल्ह्यात विविध कार्यक्रमाच्या अनुषंगाने दौरा केला. सकाळी ११:४५ वाजता पागोटे, तालुका उरण, जिल्हा रायगड येथे आदितीताई तटकरे यांचे आगमन झाले.लोकनेते कै. दि.बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जमीन बचाव आंदोलनातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. त्या नंतर जासई येथील हुतात्म्याच्या स्मृती स्थळास भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उरण तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर यांच्या नागाव येथील निवास स्थानी मंत्री आदितीताई तटकरे यांनी परीक्षित ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली.या प्रसंगी उरण तालूका अध्यक्ष परीक्षित ठाकूर व त्यांच्या कुटुंबियांतर्फे कु. आदितीताई तटकरे या मंत्री पदी विराजमान झाल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी परीक्षित ठाकूर व आदितीताई तटकरे यांच्यात उरणच्या समस्या व त्यावर उपाययोजनेच्या बाबतीत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी महाराष्ट्र शासन द्वारे सन्मानित आदर्श शेतकरी प्रकाश ठाकूर,परीक्षित ठाकूर, उरण विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर, महिला तालुका अध्यक्ष कुंदाताई ठाकूर, शहर युवक अध्यक्ष समत भोंगले,शहर अध्यक्ष तुषार ठाकूर, दिनेश पाटील, सनी म्हात्रे, त्रिकाल पाटील, स्वप्नील कुंभार, दीपराज ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. या भेटी नंतर आदितीताई तटकरे या शिर्डी अहिल्यानगर येथे जाण्यासाठी रवाना झाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here