By : Shankar Tadas
कोरपना/बिबी : कॅलिबर फाउंडेशन गडचांदूर व जय शिवशंकर क्रीडा मंडळ, बिबी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे स्वर्गीय निवृत्ती ढवस यांच्या स्मरणार्थ विदर्भस्तरीय प्रो-कबड्डी सामन्यांचे नुकतेच आयोजन पार पडले. खेळादरम्यान आयोजकांनी ट्रॅक सूटवर लोगो काढून माझी वसुंधरा ५.० योजनेची जनजागृती केली.
स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती साईनाथ कुळमेथे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक बावणे, व्यंकटेश बालसनिवार, सरपंच माधुरी टेकाम स्वागताध्यक्ष तथा उपसरपंच आशिष देरकर, कमलाबाई ढवस, पोलीस पाटील राहुल आसुटकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष स्वप्निल झुरमुरे, आनंदराव पावडे, रामदास देरकर, उत्तम काळे, देवराव ढेंगळे, सुमित्रा राजूरकर व इतर मान्यवर उपस्थित होते. संचालन कमलाकर देरकर यांनी केले.
सोमवारी बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेत प्रथम पारितोषिक आदर्श क्रीडा मंडळ नारंडा, द्वितीय पारितोषिक युवा सैनिक क्रीडा मंडळ नकोडा, तृतीय पारितोषिक जय जगनाथ क्रीडा मंडळ सांगोडा, चतुर्थ पारितोषिक जय जगनाथ क्रीडा मंडळ कढोली व पाचवे पारितोषिक जय बजरंग क्रीडा मंडळ, कारवाई यांनी पटकाविले.
वैयक्तिक बक्षिसांमध्ये बेस्ट रेडर संकेत लांडगे, बेस्ट पकड खुशाल घाटे, आवडता खेळाडू समीर वाडगुरे यांनी प्राप्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अल्ट्राटेक सिमेंट वेल्फेअर फाउंडेशन, जयराम ढेंगळे, उदय काकडे, संतोष झुरमुरे, आकाश कोडापे, निखिल हेपट, प्रशांत वाघमारे, विकास कुळमेथे, सचिन मडावी, स्वप्निल वैद्य, आशिष पोईनकर, विठ्ठल आत्राम, अमोल आत्राम, दयाल आत्राम, सुरेश मडकाम, दीपक मडकाम, करण रासेकर, आर्यन कुडमेथे, प्रतीक टेकाम, तुषार निखाडे, अविनाश मट्टे, सोमेश्वर आत्राम, देवानंद माणूसमारे, साहिल शेख, सुनील कुडमेथे, कुणाल शिवणकर, गौरव मट्टे, रोशन हेपट, तोमेश देरकर, गौरव देरकर, नितेश आत्राम तसेच गावातील नागरिक व युवकांनी सहकार्य केले.