लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे
उरण :
उरण तालुका सेवा दल काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गोपीनाथ मांडेलकर यांच्यातर्फे उरण तालुक्यातील फुंडे येथील प्रसिद्ध राम मंदिर देवस्थान कमिटी यांना भजन मंडळीचे टाळ देण्याचा कार्यक्रम मोठया उत्साहात, भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी सेवादलाचे पदाधिकारी कमलाकर घरत महाराष्ट्र प्रदेश सेवा दल सरचिटणीस, रायगड जिल्हा सेवादल अध्यक्ष वैभव ठाकूर, उरण तालुका सेवादल अध्यक्ष गोपीनाथ मांडेलकर, रायगड जिल्हा सेवादल उपाध्यक्ष दीपक ठाकूर, उरण तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अशोक ठाकूर, उरण तालुका सरचिटणीस जयवंत पाटील, रायगड जिल्हा सेवा दल सरचिटणीस ज्ञानेश्वर पाटील, उरण शहर सेवा दल कमिटीचे अध्यक्ष शैलेश तामगाडगे, फुंडे गावचे उपसरपंच चंद्रकांत म्हात्रे, परशुराम म्हात्रे, लोचन परशुराम म्हात्रे, नंदकुमार शंकर म्हात्रे, दत्ताराम शांताराम म्हात्रे उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत काँग्रेस प्रणित उरण तालुका सेवा दल अध्यक्ष गोपीनाथ मांडेलकर यांनी भजनी मंडळीना टाळ दिल्याने सर्व भजन मंडळी व इतर मान्यवरांनी गोपीनाथ मांडेलकर यांचे आभार मानले आहेत.