लोकदर्शन पुणे 7👉राहुल खरात
महिला बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद पुणे, आणि सावित्रीबाई फुले सामाजिक सेवा प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरवयीन मुलींना जेंडर आरोग्य, व कायदे विषयक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
न्यू इंग्लिश स्कूल अण्णापुर ता.शिरूर जिल्हा पुणे येथे करण्यात आले. सदर प्रशिक्षण किशोरवयीन मुलींना जेंडर म्हणजे काय हे समजावून सांगण्यात आले. वयात होणारे बदल, व मासिक पाळी मध्ये होणारा शारीरिक त्रास, मासिक पाळीचे चक्र यामध्ये नेमके काय घडते हे चित्राच्या माध्यमातून समजावून सांगितले. स्वताचे संरक्षण , वैयक्तिक स्वच्छता कशी ठेवावी, सकस आहार घेणे आपल्या आरोग्या साठी किती महत्वाचे आहे हे उदाहरण देऊन, गोष्टी रूपाने मुलींशी संवाद साधुन समजावून सांगितले.
या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून वर्षा मॅडम मनिषा ताई परदेशी यांनी मार्गदर्शन
केले . मुख्यध्यापक श्री वाबळे सर , धनश्री ताटे शिक्षिका मॅडम यांचे सहकार्य लाभले. मुलींना खाऊ शेंगदाणा लाडु वाटप केले.
मुलींच्या शंका व प्रश्नांचे निरसन करण्यात आले