By : Jayant Jenekar
कोरपना : वय वर्षे जेमतेम तीन वर्ष ,परंतु आपल्या अगाथ सामान्य ज्ञानाचा मुख पाठ परिचय देऊन नारडा येथील स्वरांशने आमदारांनाही चकित करून मान गये छोटे उस्ताद चा देण्यास शेरा देण्यास बाध्य केले. तालुक्यातील नारडा या गावात सचिन काकडे हे शेतकरी राहतात. आपल्या मुलाची भविष्यात उत्तरोत्तर प्रगती व्हावी. यासाठी त्याला नियमित सामान्य ज्ञानाचे धडे देत असतात. त्याला सकारात्मक घेत चिमुकला स्वरांश ही तो धडे आनंदाने गिरवतो. त्याला अगदी गावच्या सरपंचापासून आमदार खासदार मुख्यमंत्री पंतप्रधान,राष्ट्रपती, विविध देश व राज्याच्या राजधान्या तसेच गावातील विविध व्यक्तीची एकदा माहिती सांगितली की तो अचूक पणे देतो. त्यामुळे त्याच्या ज्ञानाचे पंच क्रोशित कौतुक व्यक्त होते आहे. याच दरम्यान त्याला त्याच्या गावात राजुरा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे हे येणार असल्याची माहिती कळाली. त्यांनी वडिलाला त्यांची भेट घेऊन देण्यासाठी आग्रह धरला. वडिलांनी त्याचा हट्ट पुरवत भेट घडवून दिली. भेटी दरम्यान आमदार महोदयांनी त्याच्याशी हितगुज केली. त्यादरम्यान त्यांनी अनेक प्रश्न सुद्धा त्याला विचारले. त्यांनी त्याना प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तरे देत आपल्या सामान्य ज्ञानाचा परिचय करून दिला. त्याच्या या कृतीने चक्क आमदार भोंगळे ही भारावून गेले. तसेच त्याला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या