टेनिस क्रिकेट स्पर्धेत सातारा, मुंबई उपनगर संघ विजयी

By : Shankar Tadas
नाशिक : नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत सातारा शहर संघाने विजेतेपद पटकावले.अहिल्यानगर संघ उपविजेता ठरला. सातारा ग्रामीण संघाने तृतीय क्रमांक संपादन केला. मुलींच्या गटात मुंबई उपनगर संघाने विजेतेपद तर सागली संघाने उपविजेतेपद व नाशिक तृतीय क्रमांक संपादन केले.

टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मुलांच्या गटात एकूण 29 संघानी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशन व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र सचिव मीनाक्षी गिरी, टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र उपाध्यक्ष विलास गिरी, महिला विभाग महाराष्ट्र अध्यक्ष धनश्री गिरी,घनःश्याम सानप (अहिल्यानगर),, शफी शेख (छत्रपती संभाजीनगर), महेश मिश्रा (ठाणे), , सिद्धेश गुरव (रत्नागिरी), इंद्रजीत वाले (धाराशिव), संदीप पाटील (मुंबई उपनगर), विलास गायकवाड (नाशिक) संदीप खलाणे नंदुरबार, ज्ञानेश्वर जाधव पुणे, रंजीत कातडे वाशिम जिल्हा कुशाल देशमुख जळगाव जिल्हा, आनंद गिरी बीड जिल्हा, नितीन सराफ अमरावती यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना सातारा आणि अहिल्यानगर जिल्हा यांच्यात झाला. सातारा संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. अहिल्यानगर संघाने चांगले प्रयत्न केले. परंतु, अहिल्यानगर संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. तसेच सातारा ग्रामीण संघाला तिसरा क्रमांक, चौथा क्रमांक ,पुणे ग्रामीण संघाला मिळाला. मुलींच्या गटात अंतिम सामना मुंबई उपनगर आणि सांगली या संघात झाला. मुंबई उपनगर संघाने उत्कृष्ट खेळ करत विजेतेपद पटकावले. सांगली संघ उपविजेता ठरला. तिसरा क्रमांक नाशिक संघाला मिळाला.या स्पर्धेतील मालिकावीर पुरस्कार मुलं मालिकावीर शार्दुल अहिल्यानगर, उत्कृष्ट फलंदाज विराज सातारा जिल्हा, उत्कृष्ट गोलंदाज, नील सातारा, मुली मालिकावीर स्नेहल सांगली, उत्कृष्ट फलंदाज तृषिता मुंबई उपनगर, उत्कृष्ट गोलंदाज आर्या सांगली जिल्हा, मिळाला, या स्पर्धेत पंच म्हणून विजय उमरे (पंच मंडळ चेअरमन), लखन देशमुख, (धाराशिव), प्रथमेश जाणस्कर. (रत्नागिरी), सोमा बिरादार (सांगली)शेख शरीफ (नंदुरबार)
मानस पाटील (मुंबई उपनगर), दर्शन थोरात (नाशिक), धनंजय लोखंडे (नाशिक), सुनील मौर्य (रत्नागिरी), धनश्री गिरी (नाशिक), रोहिणी सकटे, ऋतुजा तोरडमल, यांनी भूमिका पार पाडली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *