,
लोकदर्शन गडचांदूर 👉मोहन भारती
गडचांदूर येथील राम गणेश गडकरी सार्वजनिक वाचनालय हे गेली कित्येक वर्षांपासून वाचन कौशल्य वृद्धिंगत करण्याचे काम करीत आहे. परिसरातील विद्यार्थी हा या ग्रंथालयाचा वाचक वर्ग आहे. सार्वजनिक ग्रंथालयाचा व्याप आणखी वाढण्यासाठी नागपूर येथील मीरा फाउंडेशन आणि सनराईज इन्स्टिटयूट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६ जाने. २०२५ ला एक संगणक संच (प्रिंटर सहित) सदिच्छा भेट दिला. मीरा फाउंडेशन, नागपूर चे संचालक डॉ. पाठक सर व सनराईज इन्स्टिटयूट चे डायरेक्टर श्री रोशन पांडे यांनी गडचांदूर येथील राम गणेश गडकरी सार्वजनिक वाचनालयाला भेट दिली. याप्रसंगी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची अध्यक्षता मा. श्री विठ्ठलरावजी थिपे, उपाध्यक्ष, ग.शी. प्र. मं, गडचांदूर यांनी केली. तसेच उदघाटक म्हणून डॉ. पाठक मीरा फाउंडेशन नागपूर यांनी स्थान भूषविले. ग्रामीण भागाचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही. त्यामुळे NGO च्या माध्यमातून ग्रामीण भागातील शैक्षणिक विकास करणे हा उद्देश वरील गैर शासकीय संस्थांचा आहे. असे उद्गार पाहुण्यांनी काढले. वाचनातून ज्ञानवृद्धी होते, आजच्या मोबाईल च्या काळात पुस्तके वाचनाची वृत्ती कमी झालेली आहे, मात्र पुस्तकाचे महत्व कमी होणार नाही. वाचनातून जे समाधान मिळते ते इतर साधनातून मिळत नाही. रोजचा ताणतणाव कमी करायचा असेल तर वाचनच कमी येते. असे सांगून मा. श्री थिपे यांनी आलेल्या पाहुण्यांचे संगणक दिल्यामुळे आभार मानले.
प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. शैलेंद्र देव, प्राचार्य महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर, श्री साईनाथ मेश्राम मुख्याध्यापक महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर, श्री नागेश रोहने ग्रंथपाल, राम गणेश गडकरी सार्वजनिक वाचनालय हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
,