लोकदर्शन गडचांदूर 👉मोहन भारती
कोरपना – महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर येथील विद्यार्थी विकास विभागातर्फे कमवा व शिका योजनेतील लाभान्वित विद्यार्थ्यांना सोमवारी धनादेश वितरित करण्यात आले.
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली द्वारा राबविण्यात येणाऱ्या कमवा व शिका योजना सत्र २०२३-२०२४ महाविद्यालयात राबविण्यात आली. महाविद्यालयाच्या ८२ विद्यार्थ्यांनी वर्षभर महाविद्यालयातील विविध विभागात दररोज किमान तीन तास काम केले. त्याचा अहवाल विद्यापीठाकडे पाठविण्यात आला.
विद्यापीठाद्वारे २ लाख ९ हजार १६० रुपये मंजूर झाले. विद्यार्थ्यांना धनादेश वितरीत करण्यासाठी विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ. अजय कुमार शर्मा यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठल थिपे, सचिव धनंजय गोरे, संचालक रामचंद्र सोनपितरे उपस्थित होते.
संचालन ग्रंथपाल मनोहर बांदरे यांनी केले. आभार प्रा. चेतन वैद्य यांनी मानले. यावेळी डॉ. अनिस खान, प्रा. रामकृष्ण पटले, प्रा. चेतन वानखेडे, प्रा. संदीप घोडिले तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.