वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

लोकदर्शन वालुर👉महादेव गिरी

वालुर येथील स्व.नागाबाई साडेगांवकर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालय व ज्ञानदिप प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुलींसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.व बालिका पुजन करण्यात आले.याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.डि.भोकरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती एस.आर.सोनवणे, श्रीमती जि.आर.मळी, श्रीमती जे.बि.शिंदे , मुख्याध्यापक बि.बि.मोरे, उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी ज्ञानदिप विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी व वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थीनीची भाषणे झाली.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक बि.बि.मोरे, श्रीमती एस.आर.सोनवणे, श्रीमती जि.आर.मळी, श्रीमती जे.बि.शिंदे आदिंनी त्यांच्या मनोगतातुन सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चारीत्र्यावर प्रकाश टाकला . कार्यक्रमाचा समारोप मुख्याध्यापक एस.डि.भोकरे यांच्या अध्यक्षीय भाषणाने करण्यात आला.व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना विद्यार्थ्यांनींना कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु.गायत्री गडदे,कु.श्रद्धा राऊत या विद्यार्थ्यांनींनी केले तर आभार एस.ए.महाडिक यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रविण क्षीरसागर,जि.एम.कावळे,व्हि.एन.बोंडे,एस.आर.महाडिक बि.व्हि.बुधवंत,आर.बि.राठोड,डी.आर.नाईकनवरे,एम.एस.गिरी, आदी शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमाकांत क्षीरसागर, बळीराम शेंबडे, कैलास राऊत,व्हि.एन.पंडित,
एन.एस.आष्टकर आदिंनी परीश्रम घेतले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *