सतरा वर्षीय मुलीच्या आत्महत्या प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करा : पीडित कुटुंबीयांनी केली मागणी

By : लोकदर्शन प्रतिनिधी
कोरपना :
दुर्गापूर पोलीस स्टेशन अंतर्गत चंद्रपूर शहरातील मातोश्री कनिष्ठ महाविद्यालय येथे बारावी सायन्सला शिकत असलेल्या कोरपना तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जैतापूर गावातील सतरा वर्षीय मुलीने कॉलेज परिसरात राहत असलेल्या रूम मधे गळफास लावून अकरा नोव्हेंबरला आत्महत्या केली. मुलीच्या मामांना कळताच आरडा ओरडा केला व रूम शेजारील लोक जमा झाले. नंतर दर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तोंडी रिपोर्ट दिली. त्यानंतर मुलीच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास पी एस आय दिपेश ठाकरे यांच्याकडे गेला. एक महिना लोटून गेला परंतु त्यांनी कुठलाच प्राथमिक तपास केलेला नाही त्यामुळे ठाकरे यांच्या तपासावर पीडित कुटुंबांनी नाराजी व्यक्त केली आहे. पीडित कुटुंबांनी ठाणेदार मॅडम यांची भेट घेत झालेल्या प्रकरणाची काय चौकशी झाली अशी विचारणा केली असता पी एस आय ठाकरे यांची बदली झाली आहे असे सांगत पी एस आय मोहतुरे यांची तपासणी अधिकारी म्हणून नेमणूक केली असे संगितले. ठाणेदार मॅडम व पी एस आय मोहतूरे यांनी प्रकरण हाताळून पीडित कुटुंबाचे स्टेटमेंट नोंदवित पीडित कुटुंबांनी जैतापूर येतील आशिष नथु निब्रड ह्या तीस वर्षीय युवकावर संशय व्यक्त केला आहे. झालेल्या स्टेटमेंट वरून अधिकाऱ्याने समोरील चौकशीला गती दिली. परंतु मुलीकडे असलेला मोबाईल व संशयित असलेल्या आशिष निब्रड यांचा मोबाईल अधिकाऱ्याने जप्त करून तपासणीला पाठविला असे सांगितले. असून मोबाईल चौकशीतून काय सत्य बाहेर येणार याकडे पीडित कुटुंबाचे व गावातील जनतेचे लक्ष लागले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *