By : Shankar Tadas
गडचांदूर :
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाश्वत विकासाला चालना मिळणारे प्रयत्न करणे आवश्यक आहे. विज्ञान व शिक्षण क्षेत्रात आपला तालुका पुढे जावा व विधानसभेतच नव्हे तर जिल्ह्यात कोरपना तालुका अग्रस्थानी रहावा यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे आमदार देवराव भोंगळे यांनी प्रतिपादन केले.
कोरपना तालुक्यात स्टुडंट फोरम सारख्या विद्यार्थी चळवळीने स्पर्धा परीक्षा व शिक्षण क्षेत्रात मोठे नावलौकिक मिळवले आहे. त्या विद्यर्थी संघटनेचे मुळ देखील कोरपना तालुक्याचेच आहे हे सांगताना आनंद होतो. स्पर्धेच्या जगात टिकायचे असेल तर आपल्या जीवनामध्ये सतत वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा लागतो त्यामुळे येत्या काळात या तालुक्याने अधिकारी घडवितांनाच राष्ट्रद्धारक वैज्ञानिक ही घडवावेत. मी कायम तुमच्या सोबत आहे, असा विश्वास ही यावेळी बोलतांना त्यांनी व्यक्त केला.
शालेय शिक्षण क्रीडा विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर पंचायत समिती कोरपना यांच्या वतीने 52 व्या कोरपणा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन श्री प्रभू रामचंद्र विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नांदा येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन ढोले, प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी विजय पेंदाम, शिक्षण विस्तार अधिकारी सचिन कुमार मालवी, शिक्षण विस्तार अधिकारी कल्याण जोगदंड, उपाध्यक्ष वसंत आवारी सचिव तथा प्राचार्य अनिल मुसळे कोषाध्यक्ष संजयरावजी मुसळे सहसचिव, साईदास रोगे, सुनीता लोढीया, किसन गोंडे, मनोहर झाडे हनुमान किरटकर, तसेच सर्व विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख विषय तज्ञ विशेष शिक्षक आणि उपस्थित होते. तालुक्यातील शंभर शाळांनी सदर प्रदर्शनात सहभाग नोंदवला उपस्थित पाहण्याचे लेझीम व ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत स्वागत करण्यात आले. संचालन रामकृष्ण रोगे यांन केले, आभार संदीप खिरटकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.