श्री संत संताजी जगनाडे महाराज व विठ्ठल रुक्माई मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सवात संपन्न

By : Shankar Tadas

कोरपणा : नगरीत तैलीक समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी जगनाडे महाराज व विठ्ठल -रुक्माई व गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक 22 व 23 सतत दोन दिवस कार्यक्रम करण्याचे ठरले होते. 22 डिसेंबर रोजी श्रीराम मंदिर ते तैलीक समाज मंदिर पर्यंत ढोल ताशा चे गजरात कलश यात्रा काढण्यात आली. कलश यात्रेला मोठ्या प्रमाणात महिलांनी व पुरुषांनी सहभाग घेतला त्यानंतर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी श्री संत संताजी जगनाडे महाराज संस्थे तर्फे सर्व सहभाग घेणार यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले व 23 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर व मूर्ती तसेच विठ्ठल -रुक्माई मूर्तीचा लोकार्पण सोहळा परमपूज्य आचार्य गजेंद्र चैतन्यजी महाराज मदपुरी यांचे शुभ हस्ते मूर्ती स्थापना प्रमुख उपस्थिती- परमपूज्य स्वामी चैतन्य महाराज, परमपूज्य खेमराज महाराज पावडे ,श्री गणपतरावजी गिरडकर व सौ अंजनाताई ग. गिरटकर, यांचे शुभ हस्ते मंदिर लोकार्पन मा. न्यायमुर्ती मुरलीधरराव गिरडकर ,तसेच श्री. विजयराव बावणे, सौ नंदाताई बावणे, संस्थेचे अध्यक्ष धनराज ग. गिरडकर, उपाध्यक्ष पांडुरंग वरभे , सचिव उद्धवकुमार तडस, सहसचिव राजेश खामनकर ,कोषाध्यक्ष नारायणजी हजारे ,सदस्य प्रमोद बुटले, अनिलराव नागपुरे, प्रमोद गिरडकर, विजयराव लोहबडे, भारतजी चन्ने, नितीन बावणे ,साधुजी बावणे, ईश्वर खणके, सौ सविताताई इटणकर, सौ टिनाताई गिरडकर, यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला त्यानंतर सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत मूर्ती प्राणप्रतिष्ठा परमपूज्य आचार्य गजेंद्रजी महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी परमपूज्य स्वामी चैतन्य महाराज वडा व परमपूज्य खेमराज महाराज पावडे (पिपरी)मा, पांडुरंग महाराज पुरी महाराज उपस्थित होते त्यानंतर परमपूज्य आचार्य गजेंद्रजी महाराज यांचे काल्याचे किर्तन करण्यात आले तसेच या कार्यक्रमाला माजी खासदार हंसराज अहिर गृह राज्यमंत्री, माजी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार संजय धोटे, तसेच माजी आमदार वामनरावजी चटप, विजयराव बावणे, संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तथा उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमेटी चंद्रपूर . नगरपंचायत चे नगराध्यक्ष सौ नंदाताई बावणे , उत्तमराव पेचे , कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशोकरावजी बावणे, मान्यवरांचे आगमन व स्वागत करण्यात आले व संचालन विजय लोहबडे व तुषार बावणे यांनी केले या कार्यक्रमाला बाहेर गावातील नागरिक व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *