लोकदर्शनं 👉मोहन भारती
राजुरा -राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये दिनांक 14 जून 2006 पूर्वी नियुक्त झालेल्या व ज्यांनी सेवेत असताना 1 जानेवारी 1994 ते 11 जुलै 2009 या कालावधीत एम.फील.अहर्ता धारण केलेले नेट-सेट ग्रस्त असलेल्या प्राध्यापकांना कॅश अंतर्गत पदोन्नतीचे लाभ देणे, त्याचबरोबर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त बिगर नेट-सेट प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागण्यासह इतर अनेक मागण्या आणि समस्या सोडवण्या संदर्भात गोंडवांना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेच्या शिष्ट मंडळाने आमदार सुधाकर अडबाले व यंग टीचर्स संघटनेचे कर्याधक्ष डॉ.प्रदीप घोरपडे यांचे नेतृत्वात महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान साचिव मा. विकासचंद्र रस्तोगी साहेब यांची नागपूर विधानसभा अधिवेशन काळात भेट घेऊन उपरोक्त मागण्यांचे निवेदन दिले असून या समस्यांच्या संदर्भात माननीय प्रधान सचिव यांच्या समवेत सकारात्मक चर्चा झाली आहे.
गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटना वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांच्या हिताच्या मागण्या सोडण्याकरता अग्रेसर असून संघटनेने प्राध्यापकांच्या अनेक समस्यां निकाली काढल्या आहेत. यंग टीचर्स संघटनेच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्याकडे विविध मागण्या सादर केल्या आल्या असून यासंबंधी सकारात्मक चर्चा झालेली आहे. यामध्ये 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदाची जाहिरात असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रात स्वतंत्र सहसंचालक कार्यालयाची निर्मिती करावी, समाजकार्य महाविद्यालयाची उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे हस्तांतरण प्रक्रिया जलद गतीने करावी, तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांची थकीत वेतन देयक त्वरित मंजूर करावे यासंबंधीच्या अनेक मागण्या करण्यात आल्या आहे यावेळी आमदार सुधाकर अडबाले डॉ. प्रदीप घोरपडे डॉ. विवेक गोरलावार, डॉ.सतीश कन्नाके, डॉ. नत्थु वाढवे,डॉ. सुरेश खंगार डॉ. अभय लाकडे, डॉ.एस.बी. किशोर, डॉ.प्रमोद बोधाने, डॉ.मनीष कायरकर,डॉ.नत्थु गिरडे इत्यादी गोंडवाना यंग टीचर संघटनेचे पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.