By : Shankar Tadas
कोरपना : येथे नवनिर्मित मंदिरात श्री संत संताजी जगनाडे महाराज, विठ्ठल-रुक्माई व गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोश्रीठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. २२ डिसेंबर २०२४ रोजी वास्तुपूजन व लोकार्पण सोहळा गणपतराव गिरडकर व अंजनाताई गिरडकर यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. २३ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा परमपूज्य आचार्य गजेंद्रजी चैतन्यजी महाराज (मधापुरी) यांच्या हस्ते होईल. या वेळी परमपूज्य स्वामी चैतन्य महाराज वडा व परमपूज्य खेमराज महाराज पावडे (रा. पिपरी.) उपस्थित राहणार आहेत.
दुपारी एक वाजता लोकार्पण सोहळ्यात मान्यवरांचे आगमन व मार्गदर्शनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर दोन वाजता आचार्य गजेंद्रजी चैतन्यजी महाराज यांचे कीर्तन होईल. दुपारी तीन वाजता विजयराव बावणे यांच्या सौजन्याने महाप्रसाद व नगरभोजन होणार आहे.
श्री संत संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय तैलीक विकास संस्था, कोरपना यांच्या वतीने कोरपना तालुक्यातील भाविक व नागरिकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.