लोकदर्शन आटपाडी 👉राहुल खरात
आटपडी डी दि . ११. डिसेंबर
*माहितीचा अधिकार* ही शॉर्ट फिल्म *दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल* साठी निवडली गेल्याबद्दल सौ . शफीया शमशुद्दीन जमादार यांचा आटपाडी येथे, कुरेश कॉन्फरन्स तर्फे हृदयस्पर्शी सत्कार करणेत आला .
कुरेश कॉन्फरन्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ट पत्रकार सादिक खाटीक यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या निवासस्थानी हा सत्कार सोहळा संपन्न झाला .
आटपाडी ग्रामपंचायतीच्या शिक्षण व पाणीपुरवठा कमेटीच्या माजी अध्यक्षा सौ . राबीयाँबसरी सादिक खाटीक यांच्या हस्ते आणि कुरेश कॉन्फरन्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सादिक खाटीक, कुरेश कॉन्फरन्सचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष इंजिनियर असिफ कलाल, कुरेश कॉन्फरन्सचे प्रदेश कार्यकारणी सदस्य असिफ उर्फ बाबु खाटीक, सामाजीक कार्यकर्ते संतोषबापू जवळे, राष्ट्रवादी युवकचे तालुका सरचिटणीस नितीन डांगे, छायाचित्रकार रियाज शेख, महिला नेत्या सौ . मुमताज असिफ उर्फ बाबु खाटीक , सौ . फरहीन कुर्बानहुसेन खाटीक, सौ . रुक्साना समीर खाटीक इत्यादींच्या सन्माननीय उपस्थितीत सौ .शफीया जमादार यांचा फेटा बांधून, शाल, पुष्पहार, पुष्पगुच्छ देत गौरव करणेत आला .
आटपाडी तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सहाय्यक महसुल अधिकारी म्हणून सौ . शफीया जमादार या काही महिन्यापासून कार्यरत आहेत . बीएससी पदवी धारक असलेल्या सौ . शफीया जमादार या मुळच्या सांगलीच्या असून त्या अष्टपैलु व लक्षवेधी कलाकार आहेत . अभिनय, गीत, गाण्याचा – लिखाणाचा त्यांना छंद आहे . समाजकार्याची आवड असलेल्या सौ . शफीया जमादार यांना, *भ्रष्टाचाराचा प्रचंड तिटकारा आहे.* अनेक वक्तृत्व स्पर्धा गाजविलेल्या सौ . शफीया जमादार यांनी एकांकीका सादरीकरणातही मोठा नावलौकीक संपादन केला आहे, अभिनयासह पथनाट्य सादरीकरण करणाऱ्या शफीया जमादार यांनी, बीएससी पदवी संपादन केली आहे . शफीया जमादार या अनेक राष्ट्रीय व अंतर्राष्ट्रीय पुरस्कारांनी पुरस्कृत आहेत, राष्ट्रीय रत्न, राष्ट्र गौरव, वुमन ऑफ दि मिलेनियम, एशिया प्राईड, नॅशनल डायमंड, वर्ल्ड पीस अंबेसीडर, कोरोना वारियर, बेस्ट ह्यूमन बिईंग, नारी शक्ती, प्रतिभा सम्मान रत्न, ईंटरनॅशनल सोशियल कौन्सिलर इत्यादी पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. दादर ब्रीज, *मॅजिकल की* ही बालचित्रपट कथा, *महामार्ग माहीतीचा व संघर्ष नव्या आयुष्याचा* या मालीकाही त्यांनी निर्माण केल्या आहेत . त्या कवयित्री म्हणून हा ओळखल्या जातात . शॉर्ट फिल्म निर्मात्या व कलाकार म्हणून त्यांच्या अनेक शॉर्ट फिल्मस राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविल्या गेल्या आहेत .
ज्वलंत प्रश्नावर साभिनायासह त्यांनी निर्माण केलेल्या शॉर्ट फिल्मस लाखोंच्या प्रशंसेस पात्र ठरल्या आहेत . अतिशय आशयपूर्ण रचना व सादरीकरणातून थोड्या वेळात, नेमक्या मार्मिक मांडणी व शब्दात व्यक्त होणाऱ्या, त्यांच्या त्या त्या विषयावरील भावना संबंधीत विषयाला १०० टक्के न्याय देणाऱ्या ठरत असलेने त्यांना सर्वत्र गौरविले गेले आहे .
अतिशय गरीब परिवारातून, नगरपालिकेच्या शाळेतून शिक्षण घेतलेल्या *त्या* परिवारातल्या सर्वात थोरल्या *लेक* आहेत . विटा, तासगांव, मिरज, आटपाडी तहसील कार्यालयात १६ वर्षे सेवा बजावलेल्या शफीया जमादार यांचा भविष्यात, *दिशाहीन नवयुवकांसाठी लिखाण करण्याचा मानस आहे.* शफीया जमादार यांच्या उत्तुंग कामगिरीचे सर्वत्र मोठे कौतूक होत आहे .