लोकदर्शन गडचिरोली 👉 मोहन भारती
गोंडवाना विद्यापीठामध्ये मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे संचालक व प्रसिद्ध अभिनेते प्रा. योगेश सोमण यांच्या हस्ते उद्या सकाळी ११ वाजता स्वातंत्र्यावीर विनायक दामोदर सावरकर साहित्य अध्यासन केंद्राचे उद्घाटन होणार आहे. हा उद्घाटन सोहळा कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रा. सोमण यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर गाढा अभ्यास असून ते उपस्थितांना त्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. दृश्यम, दृश्यम २, उरी यासारख्या हिंदी चित्रपतील अभिनयाने ते सर्वपरिचित आहेत.
अध्यासन केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या बोधचिन्ह स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना अनुक्रमे रोख रक्कम पाच हजार, तीन हजार व दोन हजार तसेच प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. सदर उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी केले आहे.