By : Shankar Tadas
कोरपना
मागील काही वर्षापासून अल्ट्राटेक सिमेंट कारखान्यामध्ये लोडर कामगार आणि ठेकेदारी कामगारांच्या विविध मागण्यांना रास्त न्याय देण्याच्या उद्देशाने अनेक आंदोलने करण्यात आली.
यामध्ये विजय क्रांती कामगार संघटनेच्या वतीने लोडर कामगारांना विश्वासात न घेता,कंपनी व्यवस्थापनाशी छुपा मार्गाने विविध करारावर स्वाक्षऱ्या केल्याने लोडर कामगारामध्ये उलट सुलट चर्चा असून, १ डिसेंबर रोजी, एल.टी.अलाऊंस पगारामध्ये समाविष्ट करणे अभिप्रेत होते.मात्र,स्थानिक कामगारांची दिशाभूल करत कोणत्याही भत्ते न टाकल्यामुळे शेवटी नवनियुक्त कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुन्हा आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
एल & टी कामगार संघटनेचे सर्वाधिकारी नरेशजी पुग्लिया यांच्या नेतृत्वात महासचिव साईनाथ बुचे यांच्या सल्ल्याने लोडर कामगारांच्या न्यायोचित मागण्या पूर्ण करण्यासाठी कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले असून,मागील काही वर्षाभपासून निलंबित असलेल्या लोडर कामगारांना पूर्ववत कामावर घेणे,त्याच प्रमाणे वैद्यकीय देय,प्रवास भत्ता,व एल. टी. पूर्वी प्रमाणेच देण्यात यावी,या शिवाय इतर सर्व मागण्या मान्य न केल्यास काम बंद आंदोलन मागे न घेण्याची भूमिका लोडर कामगारांनी घेतल्याचे दिसून येत आहे.
*कामगारांच्या हिताच्या बाजूने सदैव उभा राहीन : आ. देवरावदादा भोंगळे*
कंपनी प्रशासनाचा मुजोरीपणा खपवून घेतला जाणार नाही,याशिवाय जिल्हाधिकरी महोदयांनी बैठकिमध्ये ठरविल्या प्रमाणे निलंबित कामगार,व विविध मागण्यांना घेऊन कंपनी व्यवस्थापनाला आश्वस्थ केले असताना सुध्या काही अधिकारी केवळ वैयक्तिक हव्यासापोटी कामगारांना वेठीस धरून असल्याचे चित्र दिसून येत आहे. हा प्रकार कदापि खपवून घेतला जाणार नाही. कामगारांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात मी सदैव कामगारांच्या पाठीशी उभा आहे, अशी प्रतिक्रिया आमदार देवरावदादा भोंगळे यांनी दिली.