हिरापूर येथे भाजपा कार्यकर्त्यांतर्फे नवनिर्वाचितआमदार देवरावदादा भोंगळे यांच्या विजयी मिरवणुकीचे आयोजन

By : Shankar Tadas
गडचांदूर : कोरपणा तालुक्यातील हिरापूर येथे राजुरा विधानसभा क्षेत्राचे भाजपा महायुतीचे नवनिर्वाचित आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या विजयाची मिरवणूक हिरापूर येथे ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली. कार्यकर्त्यांनी पेढे, मिठाई वाटून फटाके फोडून विजयी आंनदोत्सव साजरा केला नवनिर्वाचित आमदार निश्चितच राजुरा विधानसभा क्षेत्राच्या प्रगतीसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करेल व विकासनिधी खेचून आणेल व विधानसभा क्षेत्राचा विकास साधेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपा महामंत्री माजी सरपंच, सदस्य ग्रामपंचायत हिरापूर प्रमोदजी कोडापे, हिरापूर येथील भाजपा ज्येष्ठ नेते मारोती पा. ठाकरे, भाजपा शाखा अध्यक्ष भास्करजी विधाते, शेषराज शिलरकर, ग्रा. पं. सदस्या माया सिडाम, महिला आघाडीच्या रुकमाबाई चौधरी समशेरजी शेख, माजी ग्रा. पं सदस्य रवींद्र आत्राम, बशीरजी शेख, संजयजी बोढे कुलदीप पडवेकर, विशाल पावडे सोमेश्वर जोगी, सदाशिव टिपले,सिकंदर वाघमारे, महेंद्र वाघमारे, मारोती मडचपे, गजानन सिडाम,मोरेश्वर, अर्जुन पंधरे,वसंत विधाते,गुलाब सिडाम, बंडू बोढे,अमोल विधाते, दादाजी लोढे, अजय मडावी प्रफुल बोढे,आदी हिरापूर भाजपा कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *