* शेतक-ंयाच्या वेदनेची नाते सांगणा-या वामनराव चटप यांना निवडून द्या * ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️* माजी मंत्री बच्चु कडू यांचे आवाहन * ,,,,,,,,,,,,,,,,,

* ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर -👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
राज्यात जनसामान्यांचे मोठे प्रश्न काॅग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांनी सत्तेवर असतांना सोडविले नाही, उलट मिळेल तशी जनतेची भयावह लूट केली. या दोन्ही पक्षांनी शेतकरी, शेतमजूर, कामगार, व्यापारी, तरूण, महिला, दिव्यांग या सर्वांना छळले, आता या सर्वांचा बदला घ्यायची संधी असून महाराष्ट्रात परिवर्तन महाशक्तीचे सरकार आणण्यासाठी राज्यापुढील प्रश्न सोडविण्यासाठी ॲड. वामनराव चटप यांना विजयी करावे, असे आवाहन माजी मंत्री व प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चु कडू यांनी केले. या सभेला हजारोंच्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होत्या. सभेनंतर शेतकरी संघटनेला मोठे जनसमर्थन मिळत असल्याची चर्चा गडचांदूर वासियांमध्ये सुरू होती.
कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथे स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार ॲड.वामनराव चटप यांच्या झालेल्या भव्य प्रचारसभेत बच्चु कडू बोलत होते. वामनराव चटप म्हणाले की राजकीय,आर्थिक,सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तन करण्यासाठी परिवर्तन महाशक्ती ला जनतेने कौल द्यावा, असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी उमेदवार ॲड.वामनराव चटप, दिनेश शर्मा, रंजना मामर्डे, रिपब्लीकन नेते सिध्दार्थ पांडे, खोरिप नेते प्रविण खोब्रागडे, अरूण नवले, निळकंठ कोरांगे, विलास धांडे यांचेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेनंतर शहरात भव्य रॅली काढण्यात आली.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *