लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरपना :– उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाला नेहमीच योग्य बाजार भाव मिळवून दिला मात्र महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाला सन्मानपूर्वक भाव मिळवून देऊ शकले नाहीत. शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा केल्या मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना जमीनदोस्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत याला महायुती सरकारचे व्यापारीधर्जीनी आणि शेतकऱ्याचे खच्चीकरण करणारे धोरण कारणीभूत आहे त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेवर येणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या क्षेत्रातून आ. सुभाषभाऊ धोटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन सुप्रसिद्ध वक्ते समीरदादा लेनगुरे यांनी कोरपणा येथे केले.
महाविकास आघाडी समर्थित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रचारार्थ नगरपंचायत कोरपना च्या मागील भव्य पटांगणावर महाराष्ट्राची मुलुखमैदानी तोफ, इतिहास अभ्यासक, सुप्रसिद्ध वक्ते समीरदादा लेनगुरे यांची भव्य जाहीर सभा पार पडली यावेळी ते बोलत होते. या सभेला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी आ. सुभाष धोटे यांनी सुध्दा बटेंगे तो कटेंगे सारखे नारे देऊन लोकांना भडकविणाऱ्यांना तसेच शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना, शेतमालांचे भाव कोसळलेले असतांना कोणतेही आंदोलन न करता फक्त कागदी घोडे फिरवणाऱ्या व तीन काळे कायद्याच्या विरोधात शेकडो शेतकरी शहीद होत असताना भाजप सरकार विरोधात ब्र सुध्दा न काढणाऱ्यांना धडा शिकवा असे आवाहन जनतेला केले.
यावेळी कोरपनाच्या नगराध्यक्षा सौ. नंदाताई बावणे, राष्ट्रवादी (श. प) चे अरुणभाऊ निमजे, शिवसेना (उभाठा) चे नितीन पिपरे, तालुका प्रमुख डॉ. खणके, विजयराव बावणे, तालुकाध्यक्ष उत्तमराव पचे, शामबाबु रणदिवे, कुंदाताई जेनेकर, शामराव कोटणाके, गणेश गोडे, संभाजी कोवे, सुरेश मालेकर, भारत चन्ने, आशिष देरकर, अशोक बावणे, विनोद नवले, प्रेम बोंडे, आवारी जी, मुर्लीधर बल्की, कुंडलिक गिरसावळे, राजबाबू गहलोत, दत्तायात्र चौधरी, सुधीर थिपे, वहाब भाई यासह काँग्रेस, राष्ट्रवादी (श. प), शिवसेना (उभाठा) आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
=======================================
*पक्ष प्रवेश :–*
यावेळी कोरपना तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आ. सुभाषभाऊ धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. यात विलास उपरे, गजानन उपरे, राजु मुददलवार, सुरेश आत्राम, माधव टेकाम, मिथून मानिकपुरी, बाल्या देवाळकर, व्यंकटी मुद्दलवर, राजु शामलवार, राजेंद्र धुर्वे, आनंदराव मानकर, संदीप लांडे यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. सर्वांना काँग्रेस पक्षाचे दुपट्टे देऊन आ. सुभाष धोटे यांनी काँग्रेस मध्ये स्वागत केले. यावेळी सर्वांनी विधानसभा निवडणुकीत विकासपुरुष आ. सुभाषभाऊ धोटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी परिश्रम घेण्याचा निर्धार व्यक्त केला.