उरणातील सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांचा प्रीतम म्हात्रे यांना जाहीर पाठींबा

लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि १६ नोव्हेंबर उरणचे पहिले आमदार भाऊसाहेब डाऊर यांच्या कडून राजकारणाची आणी समाजकारणाची शिदोरी घेऊन चाणजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच,तथा उरण पंचायत समितीचे माजी सभापती व रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिवंगत रमेश डाऊर यांच्या कडुन राजकारणाचा व समाज कारणाचा वसा घेत करंजा गावाचे सुपुत्र सचिन रमेश डाऊर हे आजपर्यंत राजकरणा पासून अलिप्त असले तरी समाजकरणाची कास त्यांनी कधीच सोडली नव्हती, आपल्या आजोबांच्या आणि वडिलांच्या समाजकारणाचा वसा त्यांनी तंतोतंत जपला आहे.आजोबांची पुण्यथिती असो वा वडिलांचा स्मृतिदिन असो.किंबहुना स्वतःचा वाढ दिवस असो या दिवशी नियमितपणे गोरगरिबांना अन्न वस्त्र देऊन त्यांनी तो साजरा केला आहे,थंडीच्या मोसमात कातकरवाडीवर जाऊन मायेची उबदार घोंगडी या गोर गरिबांच्या अंगावर घातली आहे.करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेले कार्य केवळ कौतुकास पात्र असून त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्थाना केलेली वैद्यकीय मदत, अन्नधान्याची मदतही त्यांच्या त्या काळांतील अतुलनीय सेवेची मानद पावती आहे.करंजा पाणी प्रश्न,रस्त्यांचा प्रश्न,कचऱ्याचा प्रश्न असो अथवा द्रोणागिरी डोंगराच्या माती उत्खनाचा जटील प्रश्न असो,या सर्व सामाजिकदृष्ट्या महत्वप्राप्त प्रश्नाना आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात समाज माध्यमांतून सडेतोड पणे लिखाण करून जनजागृतीसाठी अहोरात्र परिश्रम करणारे सचिन डाऊर हे तरुणाच्या गळ्यातले ताईत बनले आहेत.मोठया प्रमाणात तरुणवर्ग त्यांच्या बरोबर आहे.
त्यांना अनेक वेळा टीका ही सहन करावी लागली परंतु त्या टीकेला न जुमानता त्यांनी समाज माध्यमावर आपले विचार मांडण्याचे सोडले नाही.अनेक बड्याबड्या नेत्यांनी त्यांना राजकारणाकडे ओढण्याचा प्रयत्न केला अनेक मोठमोठ्या पदांचे आमिषही त्यांना दाखविले तरीही त्यांनी हा मोह टाळून “वेट अँड वॉच” ची भूमिका बजाविली होती. “त्यांचे असे मत आहे की जोपर्यंत असा योग्य नेता सापडत नाही की जो या सामन्य जनतेच्या समस्या जाणून त्याचे निरसन करील.असे नेता ते बघत होते.त्यांना त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर त्यांना येत्या २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत एक नव्यादमाचे तरुण तडफदार नेतृत्व “प्रीतम जेएम म्हात्रे” यांच्या रूपाने मिळाले आहे”.
त्यामुळे आज पून्हा एकदा आपल्या आजोबांचा आणि वडिलांच्या राजकारणाची शाल अंगावर घेऊन उरण मधील तरुणाचे लाडके आणि आजही समाजमाध्यमावर हजारोच्या संख्येने असणारे त्यांचे चाहते, हे अस्त्र घेऊन सचिन डाऊर राजकारणाच्या आखाड्यात उतरले आहेत. आगामी उरण विधान सभा निवडणुकीत उरण मतदारसंघातील गावा गावातील मुलभूत समस्या रस्ते, पाणीटंचाई, स्वच्छता, आरोग्य तसेच बेरोजगारी, उरण मधील सुसज्ज १०० खाटांचे रुग्णालय, विद्यार्थ्यांना इंजीनियरिंग, मेडिकल कॉलेज तसेच उच्च शिक्षणा ची व्यवस्था उरण मध्ये नसल्यामुळे नवी मुंबई, मुंबई मध्ये जाण्यास किमान दोन तासाचा प्रवास करावा लागत आहे.उरण रेल्वे सुरु झाली तरी स्थानिकांना या रेल्वे प्रकल्पात नोकऱ्या मिळालेल्या नाहीत त्याच प्रमाणे आगामी काळात उरण मतदारसंघात उभारण्यात येत असलेल्या  लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर असणाऱ्या नोकरीत स्थानिक प्रकल्पग्रस्त तरुणांना समाविष्ट करण्याचा विषय, तसेच करंजा रेवस सागरीसेतू मध्ये नोकरीत आणि व्यावसायिक संधी या सर्व गोष्टींचा विचार करता हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे तरुण तडफदार उमेदवार त्यांचे मित्र प्रितम जेएम म्हात्रे यांना सचिन डाऊर यांनी जाहीर पाठींबा दिला आहे. आणि सर्व तरुणांनी आणि नागरिकांनी त्यांच्या पाठीशी राहून त्यांची निशाणी “शिट्टीचा बुलंद” आवाज उरणच्या विधानसभा मतदार संघामधून राज्याच्या विधानसभे पर्यंत पोचवा व त्यांना भरघोस मताने विजयी करा असे आवाहन सचिन डाऊर यांनी मतदारांना केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *