लोकदर्शन 👉 मोहन भारती
जिवती :– राजुरा विधानसभा क्षेत्रात सर्व सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला असून अनेक विकासकामे पूर्ण केली आहेत. महायुती सरकार च्या आडकाठी धोरणांमुळे काही विकासकामे प्रलंबित आहेत. मात्र येणाऱ्या काळात आपण कोणत्याही परिस्थितीत ती पुर्ण करू. शहरांबरोबर ग्रामीण भागातील मुलभूत विकासाला विशेष प्राधान्य देण्यात येईल. आज पर्यत ज्या विश्वासाने नागरिकांनी मला या क्षेत्रात सेवा करण्याची संधी दिली त्या सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही आ. सुभाष धोटे यांनी आपल्या जिवती, शेनगाव, पाटण येथील जनसंपर्क पदयात्रा व सभेदरम्यान नागरिकांशी संवाद साधताना दिली. जिवती च्या विकासासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करून येथे अनेक महत्त्वाच्या विकासकामांना पुर्ण केले आहे. जिवती येथे धान्याचे गोदाम, पाण्याच्या टाकी जवळ व्यायामशाळा, बुद्ध विहार, वन विभागाचे गेस्ट हाऊस, नवीन ग्रामीण रुग्णालयाची इमारत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवीन गेस्ट हाऊस, तर शेणगाव, पाटण येथे रस्ते, पाणी, आरोग्याची सुविधा, सामाजिक सभागृह, वाचनालये, व्यायामशाळा अशा सुविधा निर्माण केल्या एवढेच नव्हे तर बरीच विकासकामे पूर्ण केली असून येणाऱ्या काळात आवश्यक पायाभूत विकासकामांना गतीमान करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला गतीमान करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत भवन, ग्रंथालय, सामाजिक सभागृह, अंगणवाडी व शाळा, क्रीडांगण, बगीचे, गावातील अंतर्गत रस्ते, पांदन रस्ते, शुध्द पिण्याचे पाणी, सिंचन, पर्यटन, घरकुल अशा विकासासाठी मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला, लोकांना त्याचा लाभ होत असल्याने माझ्यासाठी ही आनंदाची बाब आहे.
ते पुढे म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीला अत्यंत पोषक वातावरण आहे, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन आल्यानंतर आपण क्षेत्रात अंतर्गत रस्ते, शुध्द पिण्याचे पाणी, ग्रामपंचायत भवन निर्माण व नुतनीकरण, स्मशानभूमींचे बांधकाम, पाणंद रस्ते, सिंचन सुविधा, घरकुल, आरोग्य शिबीर, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम, युवक कल्याण, पर्यटन तसेच अनेक शासकीय योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात नागरिकांना मिळवून देण्याचा प्रयत्न करू, क्षेत्रात पायाभूत सुविधा आणि विकास करण्यावर भर असेल त्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे राज्यात पून्हा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी, राजुरा विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेने आशिर्वाद द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी यावेळी जेष्ठ काँग्रेसचे आदिवासी नेते भिमराव पा मडावी, तालुकाध्यक्ष गणपत आडे, प्रा. सुग्रीव गोतावळे, डॉ. अंकुश गोतावळे, अब्दुल हमीदभाई, राष्ट्रवादी (श. प) चे अमर राठोड, शिवसेना (उभाठा) चे कैलास राठोड, सिताराम मडावी, नंदाताई मुसने, अश्फाक शेख, कलीम भाई, सलीम भाई, प्रभाकर राठोड, बंडू राठोड, दिवाकर वेट्टी, ताजुद्दीन शेख, पांडुरंग कोवे, गणेश शेरकर, निर्मला मडावी, शेळके ताई, अमोल कांबळे, महादेव डोईफोडे, आशिष डसाने, माधव शेंबळे, शामराव गेडाम, शिवाजी श्रीरामे यासह जिवती तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी (श. प), शिवसेना (उभाठा), व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****’*******’ ********************” ” ” ” ‘**************
वीर बिरसामुंडा जयंतीनिमित्त अभिवादन :–
यावेळी आ. सुभाष धोटे यांनी आदिवासी महानायक वीर बिरसामुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिवती, शेनगाव, पाटण येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
पक्ष प्रवेश :–
यावेळी शेनगाव येथील भाजपचे रोहिदास राठोड, बबन छपरे, अनिल पवार आणि शेतकरी संघटनेचे नागोराव देवकते, भीमनगर येथील शे. संघटनेचे गणेश कोटंबे यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. सर्वांना काँग्रेस पक्षाचे दुपट्टे देऊन आ. सुभाष धोटे यांनी त्यांचे स्वागत केले. या सर्वानी विधानसभा निवडणुकीत विकासपुरुष आ. सुभाषभाऊ धोटे यांच्या विजयासाठी जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.