लोकदर्शन सातारा 20 👉 राहुल खरात
सातारा कोरेगाव येथील सरस्वती इंग्लिश मिडीयम च्या प्रा, प्रतिभा जितेंद्र गजरमल,यांना मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांच्या शिक्षण व सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला. दुबई येथील महात्मा जोतिराव फुले विचारपीठावर आयोजित चौथे विश्व आंबेडकरवादी साहित्य संमेलन जागतिक आंबेडकरी महामंडळाच्या वतीने आयोजित केले होते.
दुसरे सत्र- परिसंवाद मध्ये
विषय होता,आंबेडकरवादी स्त्रियांची वैश्विक चळवळ,या कार्यक्रम च्या परिसंवाद अध्यक्षा
डॉ. रेहनाआरा बेग होत्या,
डॉ. विशाखा कांबळे, डॉ. सुनंदा जुलमे, प्रणिता रक्षित, डॉ. सोनाली गाडेकर, लालिता सबनीस, प्रतिभा गजरमल, मीना सुर्वे, प्रा. वैशाली देठे, सुषमा साळुंखे, रेणूताई कांबळे, डॉ. संगीता दोदे, माया बोंदाडे, डॉ. अंजुम आसिफ शेख यानी सहभाग नोंदवला
सूत्रसंचालन : डॉ. सीमा साखरे
आभार : चंपा भारद्वाज यांनी केले, आवरी होटेल मधे मान्यवरांच्या हस्ते पूस्तकाचे प्रकाशन करण्यात आले
कार्यक्रमात अध्यक्षस्थानी रावसाहेब कसबे, डॉ. श्रीपाल सबनीस (पुणे), डॉ. जगन वंजारे (सांगली), प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान (औरंगाबाद), के. पी. सिंग (दिल्ली), डॉ. कृपाशंकर वासनिक (दिल्ली), डॉ. एम. के. मकवाना (गुजरात), संमेलनाचे आयोजक प्रा. दीपक खोब्रागडे, डॉ. अंजली ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सौ.प्रतिभा जितेंद्र गजरमल सातारा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संचालन डॉ. रेहना बेग यांनी केले तर आभार अॅड. रूपेश पाटील यांनी मानले.