लोकदर्शन 👉मोहन भारती
गोंडपिपरी : राजुरा विधानसभा क्षेत्रात सर्व सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला असून त्यात बहुतांश ठिकाणी यश मिळाले आहे. काही विकासकामे तांत्रिक अडचणींमुळे आणि महायुती सरकार च्या आडकाठी धोरणांमुळे प्रलंबित आहेत. मात्र येणाऱ्या काळात आपण शहरी भागातील विकासकामांबरोबरच ग्रामीण भागातील विकासाला विशेष प्राधान्य देण्यात येईल अशी ग्वाही आ. सुभाष धोटे यांनी आपल्या गोंडपिपरी शहरातील जनसंपर्क पदयात्रेदरम्यान स्थानिक बाजारपेठेतील व्यापारी, नागरिकांशी संवाद साधताना दिली. गोंडपिंपरी शहराच्या विकासासाठी आपण सातत्याने संघर्ष करून येथे अनेक महत्त्वाच्या विकासकामांना पुर्ण केले आहे. जेव्हा जेव्हा नागरिकांना समस्या भेडसावतात तेव्हा तेव्हा आपण लगेच पाठपुरावा करून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला आहे. गोंडपिपरी येथे नगरपंचायतीच्या इमारतीचे बांधकाम, त्याच्या लगतच अग्निशमनच्या गाडीची सुविधा उपलब्ध करून दिली, इथल्या स्थानिकांना सरकारी कामकाजासाठी पोंभुर्णा येथे जावं लागत होतं म्हणून येथे उत्कृष्ट दर्जाची प्रशासकीय इमारत मंजूर करून दिली. गोंडपिपरी येथे एसडीओ ऑफिस तसेच पोंभुर्णा ला जाणाऱ्या रस्त्याला बऱ्याच प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संविधान चौक असा बायपास रस्ता मंजूर करून दिला. अशी एक नव्हे अनेक मुलभूत आवश्यक विकासकामे पूर्ण केली असून येणाऱ्या काळात आपण येथील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक विकासकामांना गतीमान करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच क्षेत्रातील ग्रामीण भागातील विकासाला अधिक गती देण्याच्या उद्देशाने ग्रंथालय, सामाजिक सभागृह, क्रीडांगण, बगीचे, गावातील अंतर्गत रस्ते विकासासाठी मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला, लोकांना त्याचा लाभ होत असल्याने ही माझ्यासाठी समाधानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीला अत्यंत पोषक वातावरण आहे, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन आल्यानंतर आपण क्षेत्रातील शहरी तसेच ग्रामीण भागात अंतर्गत रस्ते, शुध्द पिण्याचे पाणी, ग्रामपंचायत भवन निर्माण व नुतनीकरण, स्मशानभूमींचे बांधकाम, पाणंद रस्ते, सिंचन सुविधा, घरकुल, आरोग्य शिबीर, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम, युवक कल्याण तसेच अनेक शासकीय योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात नागरिकांना मिळवून देण्याचा प्रयत्न करू, विशेषतः ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा आणि विकास करण्याला आपले प्राधान्य असेल त्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे राज्यात पून्हा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी, क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेने पून्हा आशिर्वाद द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी गोंडपिपरी येथील प्रवीण फलके, रवि सोनटक्के, इंदू ठाकूर, शोभा येलमुले यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. सर्वांना काँग्रेस पक्षाचे दुपट्टे देऊन आ. सुभाष धोटे यांनी काँग्रेसमध्ये स्वागत केले. यावेळी जेष्ठ काँग्रेस नेते सुरेश पाटील चौधरी, नगराध्यक्षा सविता कुडमेथे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, कार्याध्यक्ष निलेश संगमवाऱ, शहर अध्यक्ष राजू झाडे,देवेंद्र बट्टे, शिवसेनेचे सुरज माडुरवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कुणाल गायकवाड, सोनूताई दिवसे, निलेश संगमवार, सुनील संकुलवार, अजय माडुरवार, अनिल झाडे, प्रवीण नरहरशेट्टीवार, राजू चंदेल, रफिक शेख, राजिक कुरेशी,नरेश तुंबडे, शीलाताई बांगरे, महिला शहर अध्यक्ष माधुरी गडेकर,नगरसेवक अनिल झाडे, वनिता वाघाडे, रंजना रामागिरकर, यादव बांबोडे, वनीता देवगडे, सपना साकलवार, शैलेश नगारे, दिनेश बट्टे, राकेश नगारे,अनिल झाडे, बबलू कुळमेथे,किशोर झाडे, रामदास कोसरे, कविश अवजे, प्रवीण येसनसुरे, शोभा येलमुले, रवी सोनटक्के यासह गोंडपिपरी तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी (श. प), शिवसेना (उभाठा), आम आदमी पार्टी, व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.