*दिवाळी भव्यतम सोडत मंगळवारी सर्वांच्या हिताचे रक्षण करणारी एकमेव महाराष्ट्र राज्य लॉटरी..!*
लोकदर्शन मुंबई 👉 गुरुनाथ तिरपणकर
मुंबई दि, 9 नोव्हेंबर लॉटरीचे ग्राहक, विक्रेते, वितरक, हितचिंतक आणि खुद्द राज्य सरकार या सार्यांच्या हिताचे रक्षण करणारी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या दिवाळी भव्यतम सोडतीचा निकाल हा येत्या मंगळवारी लागणार असून ग्राहकांनी लॉटरी खरेदी करुन विक्रमी विक्रीचा इतिहास रचावा! अशी अपेक्षा लॉटरी विक्रेत्यांचे जेष्ठ नेते श्री विलास सातार्डेकर यांनी व्यक्त केली आहे. गेली ५५ वर्षाची तेजस्वी परंपरा असणारी महाराष्ट्र राज्याची राज्य लॉटरी यंदाही बाजारात आली असून पारदर्शक व विश्वासहार्य असलेली ही अधिकृत लॉटरीची विक्रमी विक्री करुन उच्चांक प्रस्थापित करावा असे *आवाहन* महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विलास सातार्डेकर यांनी केले आहे. महाराष्ट्र भरातील विक्रेते, ग्राहक आणि वितरक या सर्वानी दिवाळी भव्यतम लाॅटरीसाठी आग्रह धरावा आणि वैयक्तिक बक्षिसांसोबतच राज्याच्या विकास कामासाठी त्यातून जो महसूल मिळतो, यासाठी प्रयत्नशील असावे असे स्पष्ट करून सातार्डेकर पुढे म्हणतात, यंदा ग्राहकांसोबत विक्रेत्यांसाठी रोख रकमेची विशेष योजना संघटनेनी सुरू केली आहे. जेणेकरून लॉटरीच्या अर्थचक्रात आलेली मरगळ ही दूर होईल!
लॉटरी विभागाने दिवाळीसाठी विविध आकर्षक बक्षिसांचेही आयोजन केले आहे. दिवाळी भव्यतम लॉटरीची खरेदी हा दिवाळी सणातला एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो ग्राहकांनी अधिकाधिक लॉटरीची खरेदी करावी तसेच विक्रेत्यांनीही याकामी पुढाकार घ्यावा, असेही सातार्डेकर यांनी सांगितले. अडीच लाख तिकीटांची छपाई यंदा करण्यात आली आहे पहिले बक्षीस *एक करोड* रुपयांचे असुन प्रोत्साहनपर चार बक्षिसे दोन लाखाची, दुसरी पाच बक्षीसे प्रत्येकी पाच लाखाची, तिसरी पाच बक्षीसे प्रत्येकी एक लाखाची यासोबत इतर लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात आली असून ही दिवाळी सोडत १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता नवी मुंबई लॉटरी कार्यालयात काढण्यात येणार आहे. अजुनही काही तिकीटे शिल्लक असून त्याच्या विक्रीसाठी ग्राहकांपर्यंत आकर्षक पद्धतीने पोहोचविणे बदलत्या काळात जरुरीचे आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
ज्या विक्रेते, ग्राहक यांना दिवाळी भव्यतम तिकीटे हवी असतील त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
विलास सातार्डेकर (संस्थापक अध्यक्ष) ९८९२८१७५९७
राजेश बोरकर (सरचिटणीस)
9004471885
कमलेश विश्वकर्मा (उपाध्यक्ष)
८९२८४१२२५८) यावर संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.