लोकदर्शन पनवेल👉 -गुरुनाथ तिरपणकर
“आखिर सच उगल दिया ” या पहिल्या वेबसिरीजच्या भव्य दिव्य यशानंतर “आर्यारवी एंटरटेनमेंट” आपणासमोर घेऊन येत आहे “आखिर सच उगल दिया – भाग 2” प्रमोद दळवी यांच्या संकल्पनेतून साकारलेली, महेश्वर तेटांबे निर्मित आणि दिग्दर्शित “आखिर सच उगल दिया 2” या हिंदी वेबसिरीज भाग 2 चे चित्रीकरण नुकतेच पनवेल नगरीतील काळुंद्रे या गावांत संपन्न झाले. गुन्हेगारी विश्वावर आधारित आणि गुन्ह्यांचा अचूक वेध घेणाऱ्या ह्या वेबसीरिजमध्ये अनेक नामवंत कलावंतांनी सहभाग घेतला. त्यांत प्रामुख्याने सुनील पाटेकर, रवी मोरे, रुपेश पालव, अविनाश राऊत, सुरेश डाळे पाटील, अरुण धावडे, एम नटराज, गीता कुडाळकर लक्ष्मी गुप्ता, बाळाराम चिखलेकर, प्रमोद दळवी, विशाल म्हसकर, गुरुनाथ तिरपणकर, ज्येष्ठ नाट्य अभिनेते राम सारंग, मंगल यादव, नृत्य दिग्दर्शक मनोज जाधव (एम जे), नामदेव मोहिते, सारिका विजय जाधव, शिमोन डेविट सकट, बालकलाकार आराध्या, जयश्री, शौर्य दिनेश मोहित आदी सर्व कलावंतानी महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. पटकथा-संवाद महेश्वर तेटांबे यांचे असुन या वेबसिरीज साठी छायाचित्रणाची महत्वपूर्ण जबाबदारी मकरंद अनंत पांचाळ यांनी पार पडली असून सोनाली पेडणेकर यांची रंगभूषा लाभली आहे. संकलन आणि संगीत तसेच ध्वनिमुद्रणाची जमेची बाजू महेश मोरे यांनी सांभाळली आहे. तर सहाय्यक दिग्दर्शन अक्षय भोसले यांनी केले आहे. या संपुर्ण वेबसिरीजचे व्यवस्थापन अरुण धावडे आणि
लक्ष्मी गुप्ता यांनी केले. या वेबसिरीजमध्ये काम करणाऱ्या सर्व कलावंतांची तीन दिवसीय भोजन व्यवस्था सौ.मंगल यादव (करंजाडे) यांनी केली. या वेबसिरीज साठी प्रसिद्ध समाजसेवक, अभिनेते खलील शिरगांवकर, रवी शिवराम मोरे, सचिन परदेशी, भास्कर वाकडीकर, मनीष व्हटकर, विकास म्हसकर, बाळाराम चिखलेकर आणि विशाल म्हसकर यांचे विशेष योगदान लाभले आहे.