लोळदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि ८ नोव्हेंबर भारतात सर्वत्र छटपूजा साजरी केली जाते.विशेषता: बिहार,झारखंड, उत्तर प्रदेश राज्यात शटपूजा सण मोठया उत्साहात साजरी केली जाते. या व्रता दरम्यान स्त्रिया निर्जल उपवास करतात. व सूर्याला अर्ध्या देऊन (पूजन करून )हा उपवास सोडण्यात येतो.हे व्रत सौभाग्य व समृद्धीसाठी आणि संतान प्राप्तीसाठी करण्यात येते. या व्रता दरम्यान सूर्यपुत्र यम व त्याची बहिण षष्ठी हिचे पूजन केले जाते दरवर्षी कार्तिक (मराठीच्या अश्विन) महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्ठी तीथीला छट पूजा साजरी केले जाते. बिहारमधून सुरू झालेले हे सण आता संपूर्ण भारतात सर्वत्र साजरा केले जाऊ लागले आहे. महाराष्ट्रातही सर्वत्र मोठया उत्साहात हा सण साजरा केला जातो.
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात हा सण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. उरण मध्ये पिरवाड समुद्रकिनारी महिला वर्गांनी मोठ्या प्रमाणात छट पूजा साजरी केली. यावेळी बसंत पंचमी ट्रस्ट संस्थापक रंजनकुमार यांनी माँ छटी ची कृपा सर्वांवर राहू दे, सर्वांना सुख समृद्धी शांती निरोगी आयुष्य लाभू दे अशी प्रार्थना केली. ७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सूर्याला अर्ध्य देऊन पूजा करण्यात आली तर ८ नोव्हेंबर रोजी सकाळी पूजन करून छटपूजा साजरी करण्यात आली. यावेळी बसंत पंचमी ट्रस्ट चे चेअरमन दिनेश जैस्वाल, प्रेसिडेंट पी.टी. चव्हाण,व्हॉइस प्रेसिडेंट एस एन रॉय, जनरल सेक्रेटरी कामेश्वर शर्मा, ट्रेसरर मनोज कुमार शर्मा, सेक्रेटरी राम चौहान, ऑरग्नाईज सेक्रेटरी दिपक कुमार मिश्रा व इतर पदाधिकारी सदस्य मोठया प्रमाणात उपस्थित होते.