ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे कृष्णा पांडूरंग वाघमारे निवडणूक रिंगणात

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल म‌मताबादे

उरण दि.६ नोव्हेंबर उरण विधानसभा मतदार संघात १४ उमेदवार उभे असून गोर गरिब शोषित, वंचित आदिवासीच्या न्याय हक्का साठी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक चे उमेदवार कृष्णा पांडुरंग वाघमारे ( निशाणी सिंह)हे निवडणूक लढवित आहेत. उरण विधानसभा मतदार संघात आदिवासी, दिन, शोषित,वंचित घटकावर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे तसेच अनेक विविध समस्या प्रलंबित आहेत. त्या सोडविण्यासाठीच उरण विधानसभा मतदार संघातून ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षातर्फे निवडणूक लढवित असल्याचे उमेदवार कृष्णा पांडुरंग वाघमारे यांनी सांगितले. निशाणी सिंह असलेल्या बटन दाबून मला बहुमताने निवडून द्या. जेणेकरून जनतेच्या समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन असे आवाहन कृष्णा पांडुरंग वाघमारे यांनी जनतेला केला आहे.

आपले मत व्यक्त करताना कृष्णा पांडुरंग वाघमारे यांनी सांगितले की आदिवासी गावठाण, दली प्लॉट, वन हक्क, मूलभूत सुविधा (पाणी, घरकुल, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य) हे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार,आदिवासी आणि ओबीसी च्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही,रिक्षावर ज्याचं पोट आहे अश्या सर्व रिक्षा धारकांना मोफत बिमा काढून देणार,उरणमधील वाढते दूषित वातावरण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून कोर्टात दाद मागणार,प्रत्येक नागरिकाला आपले अधिकार कळावे या साठी हर घर संविधान हा संकल्प राबवणार,चिरनेर हुतात्मा स्मारकाला पर्यटन स्थळ बनवणार,तरुणांना खेळाच्या माध्यमातून करियर संधी उपलब्ध करून देणार,१२. ५% आणि २२. ५% मध्ये शेतकऱ्यांवर होणारा अन्याय या साठी सिडको व इतर अन्याय संस्थेशी संघर्ष करणार,स्थानिकांना स्थानिक उद्योगात रोजगार संधी उपलब्ध करून देणार,जमिनी साठी बिटिशांविरुद्ध लढणाऱ्या सर्व हुतात्म्यांचे मेमोरियल बनवणार,वाढत्या गुन्हेगार प्रवृत्तीला रोखण्यासाठी पोलीस व न्यायालयाच्या माध्यमातून नागरिकांची सुरक्षा करणार,गरीब आणि गरजू विद्यार्थी जे सरकारी शाळेत शिकतात त्यांच्यासाठी शासन स्तरावर विविध योजनांसाठी मागणी करणार असल्याचे यावेळी कृष्णा पांडुरंग वाघमारे यांनी सांगितले.

याप्रसंगी उपस्थित असलेले इंडियन्स सोशल मूहमेंट चे महाराष्ट्र अध्यक्ष तथा संविधान प्रचारक अँडवोकेट प्रकाश विजय कदम (करंजाडे, पनवेल ) यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक चे कृष्णा पांडुरंग वाघमारे यांना जाहिर पाठिंबा देत कृष्णा पांडुरंग वाघमारे हे जनतेच्या हितासाठी काम करतात अनेक समाजोपयोगी कामे त्यांनी केली आहेत. शोषित वंचित आदिवासी घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. कृष्णा वाघमारे हे आदिवासी समाजातून आलेले उत्तम व आदर्श नेतृत्व आहे. त्यांना विधानसभेत पाठवून आदिवासी, बहुजन समाजाचा आवाज बुलंद करावा असे आवाहन ऍड. प्रकाश विजय कदम यांनी जनतेला केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *