लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे
उरण दि. ६ नोव्हेंबर उरण विधानसभा मतदार संघाची निवडणूक २० नोव्हेंबर २०२४रोजी होणार असून त्या अनुषंगाने महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) तर्फे दिनांक ६/११/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता आनंदी हॉटेल कोटनाका उरण येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मनोहर भोईर यांना जाहिर पाठिंबा देत असल्याचे घोषित करून महाविकास आघाडीच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकदिलाने, एकत्र येउन काम करावे व महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहरशेठ भोईर यांना बहुमतांनी निवडून दया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर यांनी केले.
आनंदी हॉटेल कोटनाका येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आयोजित केलेल्या आढावा बैठकीतील भाषणात भावनाताई घाणेकर म्हणाल्या की उरणचे परप्रांतीय आमदार महेश बालदी यांनी कोणतेही विकासकामे केली नाही. उलट त्यांनी नको त्या कामाचे श्रेय त्यांनी घेतले आहे. महेश बालदी यांनी नेहमी स्थानीक भूमीपुत्रांचा अपमान केला आहे. येथील आगरी कोळी कराडी समाज त्यांना कधीच माफ करणार नाही. स्थानिकांचे प्रश्न सोडविण्याचे व विकासासाठी महा विकास आघाडीचे उमेदवार मनोहरशेठ भोईर हेच खऱ्या अर्थाने उरणचा विकास करतील. स्थानिक भूमीपुत्र व महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मनोहरशेठ भोईर यांना कायमचा पाठिंबा आहे. यावेळी मनोहर शेठ यांना निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे मत भावनाताई घाणेकर यांनी व्यक्त केले. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मनोहरशेठ भोईर यांनी आपल्या भाषणात महायुतीचे उमेदवार महेश बालदी यांच्यावर जोरदार प्रहार केला. परप्रांतीय आमदार निवडून दिल्याने उरणचा बट्याबोळ झाला आहे. महेश बालदी मूळे उरणचा विकास झालाच नाही. परप्रांतीय असल्याने त्यांना आगरी कोळी कराडी समाज,मराठी लोकांशी काहिच देणेघेणे नाही. महेश बालदी नावाचा पार्सल या निवडणूकीत राजस्थानला पाठवा. २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन मनोहरशेठ भोईर यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मनोहरशेठ भोईर यांनी आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना यावेळी नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहरशेठ भोईर, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संतोष ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा नवी मुंबई निरीक्षक भावनाताई घाणेकर, रायगड जिल्हाध्यक्ष दिपीका भांडारकर, जिल्हा सरचिटणीस किरण कडू, किशोर ठाकूर, रायगड जिल्हा युवक कार्याध्यक्ष समाधान म्हात्रे,उरण तालुका अध्यक्ष प्रदीप तांडेल, महिला तालुका अध्यक्ष हेमांगी पाटील, उलवे अध्यक्ष संगीताताई बगाडिया, पनवेल तालुका अध्यक्ष सुजित पाटील,खालापूर तालुकाध्यक्ष विष्णू जांभळे,जेष्ठ नेते मनोज भगत, विधानसभा अध्यक्ष गणेश नलावडे, तालुका युवक अध्यक्ष सचिन पाटील,तालुका सरचिटणीस भूषण ठाकूर,उरण तालुका सल्लागार संतोष ठाकूर,करंजाडे युवा नेते सचिन केणी,कोप्रोली पूर्व विभाग प्रमुख लक्ष्मण म्हात्रे, मोठी जुई अध्यक्ष अनिल कदम,शहर अध्यक्ष मंगेश कांबळे,उलवे अध्यक्ष बाळा म्हात्रे आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक मोठया उत्साहात, उत्तम प्रतिसादात संपन्न झाली.