लोकदर्शन 👉मोहन भारती
जिवती :– राजुरा विधानसभा क्षेत्रात सध्या निवडणूकीची प्रचंड धामधूम सुरू असून लोकशाहीच्या या महोत्सवात सर्वच राजकीय पक्ष शड्डू ठोकून निवडणूक आखाडय़ात उतरले आहेत. लोकप्रिय आमदार सुभाष धोटे क्षेत्रातील आपले विविध विकासकामे, जनसेवेचे घौडदौड सुरू ठेवित सर्वांगीण विकासासाठी पून्हा एकदा मैदानात उतरले असून त्यांनी आपला जनसंपर्क अधिक व्यापक केला आहे. चारही तालुक्यातील मतदारांकडून त्यांना प्रचंड जनसमर्थन मिळत असून भाजप, शेतकरी संघटनेसह विविध पक्षातील कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेसमध्ये पक्ष करीत आहेत. जिवती तालुक्यातील मौजा शेनगाव, धोंडामांडवा, हिरापूर, देशमुखगुडा येथील प्रभावशाली असलेल्या हटकर समाज बांधवांचा लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांना आणि महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला असून विधानसभा निवडणुकीत ते पुर्ण ताकदीने सुभाषभाऊंच्या विजयासाठी काम करणार असल्याचा संकल्प केला आहे. यावेळी हरिदास मुकनड,कोंडीबा मस्के, सिधराम सलगर, रामेश्वर चव्हाण, मनोज सलगर, चिमाजी सलगर,अक्षय सलगर, सिधू सलगर, रंगनाथ देशमुख आदींनी भाजपला रामराम करीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तर जिवती तालुक्यातील भारी येथील गोंडवाना पक्षाचे रमेश आर्गेलवार आणि पाटण येथील परमेश्वर सोनकांबळे यांनी काँगेस पक्षाची विचारधारा आणि आ. सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेस मध्ये प्रवेश केला. आ. सुभाष धोटे यांनी हटकर समाज बांधवांचे तसेच नवप्रवेशीत कार्यकर्त्यांचे काँग्रेस पक्षाचे दुपट्टा देऊन काँग्रेस पक्षात स्वागत केले. यावेळी आर्गेलवार आणि सोनकांबळे यांनी विधानसभा निवडणुकीत विकासपुरुष आ. सुभाषभाऊ धोटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी परिश्रम घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी काँग्रेसचे आदिवासी नेते भिमराव मडावी, तालुकाध्यक्ष गणपत आडे, सुग्रीव गोतावळे, ताजुदीन शेख, सिताराम मडावी, महिला अध्यक्षा नंदाताई मुसणे, शबीर भाई, माधव डोईफोडे, देविदास साबणे, बाबुराव कांबळे, गणेश शेटकर, अमोल कांबळे, बालाजी कर्ले, बंडू राठोड, तुरणकर, किशोर चांदुर, सुनील शेळके, उत्तम कराळे, सुधाकर नागोसे, सागर कोटणाके, रमेश कोटणाके, मुनीर भाई, सत्तरशहा कोटणाके, नारायण शेंडे, जंगू कोटणाके, तिरूपती पोल्हे, रामराव शेळके, नायकु सिडाम, अकबर शेख, रामकिसन गायकवाड यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.