सिंदखेड राजा येथे सर्व उमेदवारांची आढावा बैठक संपन्न

लोकदर्शन देऊळगाव राजा👉प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
मा. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता निवडणूक कार्यक्रम घोषित केला असून दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे त्या अनुषंगाने 24 – सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी यांची आज दिनांक 05 नोव्हेंबर 2024 रोजी आढावा बैठक निवडणूक विभाग तहसील कार्यालय सिंदखेडराजा येथे मा.निवडणूक खर्च निरीक्षक दानिश अब्दुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

आजच्या बैठकीमध्ये दानिश अब्दुल्ला यांनी उमेदवार तसेच प्रतिनिधी यांना उमेदवारांना खर्चाची मर्यादा 40 लाख रुपये आहे असे सांगितले. प्रत्येकाने निवडणूक प्रचार, रॅली, सभा,जेवण, चहा पाणी याबाबतचा सर्व खर्च हा निवडणुकीबाबत उघडण्यात आलेल्या नवीन खात्यामधून करणे अपेक्षित आहे. केलेल्या खर्चाचा हिशोब व्हाऊचर वर संकलित करून ठेवावा व तो अचूक स्वरूपातील खर्च नोडल अधिकारी यांच्याकडे प्रति दोन दिवसांनी सादर करावा.

प्रचारामध्ये वापरलेल्या वाहनाचा दर हा आरटीओ कार्यालयाने दिलेल्या दरानुसारच असावा. 10 हजार रुपयापर्यंत रोख व्यवहार हा उमेदवार करू शकतो. या सोबतच सोशल मीडियाद्वारे केलेला खर्च सुद्धा हिशोबात पकडला जाणार आहे. तसेच निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक उमेदवाराने 30 दिवसाच्या आत प्रतिज्ञापत्रात आपला हिशोब सादर करणे आवश्यक आहे. सदर सभेमध्ये केलेले खर्च हे निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या दरानुसारच अपेक्षित आहे, अशा महत्त्वाच्या सूचना मा. निवडणूक खर्च निरीक्षक दानिश अब्दुल्ला यांनी सर्व उमेदवारांना तसेच अधिकाऱ्यांना दिल्या.

आजच्या या सभेचे आभार प्रदर्शन मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले. आजच्या या सभेला मा.सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सिंदखेडराजा अजित दिवटे, मा. मा.सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार देऊळगाव राजा वैशाली डोंगरजाळ, मा.सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी सिंदखेड राजा मुकेश माहोर, मा. निवडणुक नायब तहसीलदार मनोज सातव, मा. निवडणुक नायब तहसीलदार देऊळगाव राजा प्रवीण घोटकर, प्रसार माध्यम नोडल अधिकारी अंकुश म्हस्के, संजय सोनुने तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *