बिथरलेल्या विरोधकांच्या थयथयाटाची किव येते : अरविंद डोहे

By : Mohan Bharti

गडचांदूर :
स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्यांच्या चांगल्यात वाईट शोधण्याची वाईट सवय जडलेल्या विरोधकांच्या निरर्थक थयथयाटाची किव येते, असा घणाघात भाजपाचे गडचांदूर शहराध्यक्ष अरविंद डोहे यांनी केला आहे.
राजुरा विधानसभेचे महायुतीचे उमेदवार तथा सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राचे संचालक देवरावदादा भोंगळे यांनी राजुरा विधानसभेत गडचांदूर शहरासह ठिकठिकाणी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र नावाने सेवा कार्यालये उघडली. त्या माध्यमातून मागील दीड-दोन वर्षांपासून या भागातील गोरगरीब नागरिकांना विविध शासकीय योजनांचा निःशुल्क रीतसर लाभ, माहिती आणि मोफत महाआरोग्य शिबिरांचे आयोजन ते करत असतात.
महायुतीचे उमेदवार देवरावदादा भोंगळे यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे ते त्यांच्यावर निरर्थक व खोटे आरोप करून नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत.
अलीकडेच समाज माध्यमांमध्ये कुण्या कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांने एका खाजगी कार्यालयात काम केलेल्या युवकाशी बोगस मतदार नोंदणीवरून झालेले संभाषण वायरल होत आहे. आणि त्यामधे जाणिवपूर्वक ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र गडचांदूरचे नाव गोवण्यात येत आहे. परंतु त्यांचा हा दावा संपूर्ण खोटा असून या भागातील जनतेच्या सेवेसाठी नवा अध्याय सुरू करणाऱ्या ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात असे काम केव्हाच झाले नाही, होणार नाही. तथापि याच गडचांदूर शहरात अनेकांचे कार्यालये आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी असा गैरप्रकार झाला असेल, तर त्याची तातडीने सखोल चौकशी करून दोषींना गजाआड केले पाहीजे अशी आमची मागणी त्यांनी,आहे. तथापि त्या तथाकथित ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळून तो मुलगा कोण? त्याने गडचांदूर शहरातील नेमक्या कोणत्या कार्यालयात काम केले, त्याला कामावर लावणारा तो शुभमभाऊ कोण? याचीही चौकशी करण्यात यावी. खरंतर आमच्या गडचांदूर येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात कोणत्याही बाहेर गावातील मुलांना कामावर ठेवून त्यांचेकडून बोगस मतदार नोंदणी करण्यात आलेली नाही. परंतु फेक नरेटिव्हच्या भरोशावर बसलेल्या संधीसाधू कॉंग्रेस नेत्यांना खोटनाटे आरोप करण्याशिवाय दुसरे काम उरले नाही. ज्या गोष्टींशी आमचा दुरान्वयेही संबंध नसतो अशाजागी आमचे नाव पुढे करून ते बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु जनतेला सेवा देणारे कोण आणि शिव्या देणारे कोण याची चांगलीच ओळख झाली असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत जनताच अशा खोटारड्यांना त्यांची जागा दाखवणार आहे. तथापि पराभवाच्या भीतीने बिथरलेल्या कॉंग्रेस नेत्यांना जागोजागी देवरावदादा भोंगळेच दिसत असल्याने त्यांनी लवकरात लवकर चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असा खोचक सल्ला ही अरविंद डोहे यांनी विरोधकांना दिला आहे

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *