,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ज्ञानगंगा नित्यानंद माऊली आश्रम सेवा संस्था व गोपालन केंद्र कोलांडी /नंदप्पा द्वारा नित्यानंद गोपालन केंद्र गोपालपुर/गडचांदूर त.कोरपना येथे गोमाता स्थायी छावणी उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये सकाळी गुरू गीता , महासत्संग ,गोवर्धन पूजा व गोमाता स्थायी छावणी शेड चे उद्घाटन करण्यात आले त्या ठिकाणी उद्घाटक म्हणून लाभलेले डॉ.श्री गिरीधर भाऊ काळे समाजसेवक यांचा आश्रम कमिटी तर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्या हस्ते गोमाता स्थायी छावणी निवारा यांचे उद्घाटन करण्यात आले . कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माजी आमदार एड. वामनरावजी चटप , श्री हंसराज जी भैया चौधरी ,डॉ. के आर भोयर , श्री प्रशांत भाऊ गोखरे श्री धनंजय छाजेड श्री राकेश अरोरा ,महादेव हेपट, रोहन काकडे, सचिन भोयर , कृष्णा बत्तुलवार, प्रा.विजय आकनुरवार श्री प्रशांत भाऊ चटप ,श्री चांडक साहेब, श्री रघुनाथ लोनगाडगे ,डॉ. लोनगाडगे श्री उरकुडे अर्जनिस ,श्री शिवाजी सेलोकर ,सौ पोतणुरवार मॅडम आदी मान्यवरांचा आश्रम कमिटी तर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात. आला, कार्यक्रमाला परिसरातील 400 ते 500 भाविकांची उपस्थिती होती मान्यवरांनी आपल्या मनोगतातून भारतीय संस्कृतीनुसार गाईला मातेचा दर्जा दिला आहे आणि तिच्या पोटात 36 कोटी देवाचा वास असल्यामुळे गो सेवा ही महान सेवा आहे अशी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून प्रतिक्रिया दिली गोसेवेच्या कार्याच्या सेवेची प्रशंसा केली ,आणि भविष्यात या गोपाळपूर गावाची ओळख गोपालन केंद्र आहे ते
गोपाळपूर या नावाने चंद्रपूर जिल्ह्यात नाहीतर महाराष्ट्रात सुद्धा ओळखले जाणार असे वक्तव केले तसेच आजच्या घडीला वृक्ष कापले जात आहे निसर्ग वातावरण प्रदूषित होत आहे म्हणून एक छोटासा बालक कु. तनिष्क प्रशांत पोतणुरवार या बालकांनी एक प्रोजेक्ट तयार केलाय त्या प्रोजेक्टचे नाव आहे वृक्षआश्रम या माध्यमातून आश्रम कमिटी कडून तसेच मान्यवराकडून गोपालन केंद्र येथे वृक्षारोपण करण्यात आले या बालकास मान्यवरांनी शुभ आशीर्वाद दिले तसेच ज्यांनी या गोपालन सेवेला जमीन दान स्वरूपात दिली त्या श्रीमती जंगुबाई पंधरे यांचा आश्रम कमिटी तर्फे शाल व श्रीफळ व वस्त्र देऊन सत्कार करण्यात आला व आश्रमातील पुजारी व गोमातेची सेवाकऱ्याना आश्रम कमिटी तर्फे वस्त्र दान करण्यात आले तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री शंकररावजी देवाळकर यांनी आपल्या मनोगतातून सेवेचे महत्त्व साधना सेवा सत्संगाचा माध्यमातून चालत असताना आपली भावना शुद्ध असेल निस्वार्थ असेल आणि एकत्रित येऊन कार्य केले तर अशक्य काहीच नाही स्वामी समर्थाच्या ब्रीद वाक्य नुसार अशक्य ही शक्य करतील स्वामी “गुरुकृपा केवलाम “आश्रमाच्या स्थापनेपासून ते भविष्याच्या सेवेबद्दल विचार मांडले व वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचे व भाविकांचे आभार मानले तसेच श्री सुधाकर पाटील तोडासे रा.थुट्रा यांच्याकडून भाविकांसाठी साठी महाप्रसादाचे आयोजन करण्यातआले संचालन श्री संतोष पोडे यांनी केले आणि या सेवेला पूर्ण करण्यासाठी आश्रमाचा महिला पुरुष सेवकांनी अथक परिश्रम घेतले तसेच भाविकांना महाप्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .