समाजसेवेचा अविरत झरा नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार : भाग 1

चंद्रपूर 👉नम्रता आचार्य ठेमस्कर

मागच्या जवळ जवळ तीस वर्षांपासून सुधीरभाऊ जनसेवेत आहे. या तीस वर्षात त्यांचं जनतेशी असलेलं नात दिवसागणिक आणखी आणखी दृढ होत गेलं. कारण भाऊंनी त्याच दिवशी समाजातील सर्व घटकांना आपलं कुटुंब मानलं,ज्या दिवशी समाजसेवेचे व्रत भाऊंनी हातात घेतले. या तीस वर्षाच्या काळात प्रचंड चढउतार त्यांनी अनुभवले पण कधी ते खचले नाही कारण जनता सदैव त्यांच्या सोबत होती आणि आजही आहे.

काल नामांकन दाखल करतांना जो जनसमुदाय मूल नगरीत अवतरला तो बघून सर्वांचेच डोळे दिपून गेले आणि विरोधकांच्या पोटात गोळा आला इतकं प्रेम त्या गर्दीतून ओसंडून वाहत होत. मागच्या तीस वर्षांपासून सुधीर भाऊ आणि सामान्य जनता हे एक समीकरण बनले आहे. शेवटला श्वास असेपर्यंत जनसेवा करणे हेच त्यांनी आयुष्यातील आपले ध्येय मानले आहे.आपला शेवटला श्वास सुद्धा या मातीसाठी आणि माणुसकी जपण्यासाठी आहे असे मानऱ्यांपैकी सुधीरभाऊ एक जनसेवक आहेत.

घरातील सर्व सदस्य डॉक्टर असतांना भाऊंनी सामाजिक सेवेच्या माध्यमातून राजकारणाची कास धरल्यावर घरातल्या लोकांना त्यांचा निर्णय आधी फारसा आवडला नाही.पण त्यांची जिद्द होती काही तरी समाजासाठी करण्याची त्यांच्या या हट्टापुढे कुटुंब सुद्धा भक्कम पणे त्यांच्या सोबत उभे राहिले. साधे आमदार ते राज्याचा कॅबिनेट मंत्री असा हा प्रवास केवळ आणि केवळ जनतेच्या साथीने त्यांनी पूर्ण केला.

एकुलत्या एक मुलीसोबत कधी त्यांना कोणी खेळतांना बघितले नाही. ती कधी मोठी झाली कदाचित हे सुद्धा त्यांना कळले नसेल कारण ते घरी राहिलेच नाही, ते सतत जनते मध्ये राहिले. जे विशाल कुटुंब त्यांनी निर्माण केले त्यामध्येच सतत त्यांनी आपलं आयुष्य घालवल. भारतीय जनता पक्ष तेव्हा सत्ताधारी पक्ष नव्हता अशा परिस्थितीत भाऊंना भारतीय जनता पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी सतत बाहेरच फिरावे लागायचे.

जितकं आयुष्य त्यांनी घरात घालवल नाही, तितकं जनतारुपी कुटुंबात घालवल. त्यांच्या चेहऱ्यावर आमच्या सारख्या अनेकांना नेहमी आनंद दिसला, जेव्हा त्यांचे जनता रुपी मोठे कुटुंब आनंदात राहिले आणि जेव्हा त्यांच्या या मोठया कुटुंबात दुःख आले, संकट आले तेव्हा आपल्या लोकांच्या डोळ्यातील अश्रू त्यांच्या डोळ्यात दिसले .कार्यकर्त्यां सोबत भाऊ नेता बनून वावरत नाही तर आजही मी भारतीय जनता पार्टीचा एक साधा कार्यकर्ता आहे असे समजून ते वावरतात. एका मोठ्या झालेल्या माणसाचे पाय जमिनीवर किती घट्ट रोवले आहेत याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे सुधीर भाऊ मुनगंटीवार.

भाऊं सोबत चर्चा करतांना भाऊं सांगतात, “कोणताच माणूस परिपूर्ण असू शकत नाही कदाचित परमेश्वराने माझ्यातही काही कमी ठेवली असेल पण जनतेने जे प्रेम मला दिले ते या जन्मात तरी हे ऋण फेडणे शक्य नाही. पण मी पूर्ण शक्तीने ते याच जन्मी फेडण्याचा प्रयत्न करेल. कारण तेच माझ्या आयुष्याचे उत्तरदायित्व आहे.आणि खर तर मला शेवटपर्यंत माझ्या या जनतारुपी कुटुंबाच्या ऋणातच राहायचे आहे.” असे बोलताना आपल्या कामासाठी ची त्यांची कटीबद्धता दिसून येते.

भाऊंनी कोणतेही काम करतांना जात, धर्म,पंथ बघितला नाही, कोणता माणूस कामासाठी आला हे देखील बघितले नाही आलेल्या प्रत्येक माणसाचे काम नियोजनबद्ध पद्धतीने कसे पूर्ण करता येईल, त्याचा सतत पाठपुरावा करणे हा भाऊंकडून कार्यकर्त्यांनी शिकवा असा सर्वात मोठा गुण आहे. त्यांचा आनंद ती मूल खेळतांना बघून द्विगुणित होतो ज्यांचे हृदयाचे ऑपरेशन त्यांच्या माध्यमातून झाले. रोज शेकडो आया बहिणी ज्या वेळी आपल्या लेकरासाठी भाऊं कडे भेटायला येतात. त्यावेळी त्यांनी कधीच कोणत्याही भगिणीला विचारलं नाही तुमची जात काय? धर्म काय? सर्वधर्मसमभावाचे मर्म सर्वाधिक कोणी बाळगले असेल तर ते सुधीर भाऊंनी.

अनेक गरीब भगिनी कॅन्सर या आजाराने ग्रासल्या गेल्या आहेत, अनेक नागरिक कॅन्सरग्रस्त आहे.जिल्ह्यात कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. याचाच विचार करून १०० कोटीं टाटा ट्रस्ट कडून आणून शासकीय मदतीने त्यांनी कॅन्सर हॉस्पिटल उभे केले ही काही लहान गोष्ट नाही .

“एक वेळ श्रीमंताला आजारपण आले तर ते मोठया मोठया दवाखान्यात जातील पण माझ्या गरीब बांधवांवर अशी वेळ आली की देव जणूकाही त्यांची परीक्षा बघत आहे अशी परिस्थिती तयार होते. त्या साठी कॅन्सर हॉस्पिटल हे माझं स्वप्न होतं आणि टाटांच्या मदतीने मी ते पूर्ण केलं आहे. आता माझ्या भावा बहिणींना मुंबई, नागपूर इतक्या दूर जायची आता गरज नाही”. असे भाऊं याबाबतीत सांगतात.

देशासाठी सैनिक आपले बलिदान देतात या देशाची रक्षा सैनिक करत असतात म्हणूनच असे सैनिक देशभक्त तयार करण्यासाठी सैनिकी शाळा बल्लारपूर मध्ये भाऊंनी उभारली. मतदारसंघात चांगले बसस्टँड तयार केले, रस्ते तयार केले, बोटनिकल गार्डन मध्ये आज चारशे भगिनी काम करत आहेत. मुलींसाठी त्यांच्या उच्चशिक्षणासाठी त्यांना दूर जावे लागू नये म्हणून एस.एन. डी.टी. विद्यापीठा चे काम पूर्णत्वास जात आहे.चंद्रपूर मधील मेडिकल कॉलेज सुद्धा एक मैलाचा दगड ठरणार आहे. गोरगरिबांसाठी अद्ययावत शासकीय रुग्णालय तयार आहे. मूल मध्ये एमआयडीसी आणून इथल्या मुलांना नौकऱ्या मिळवून देण्याचा प्रयत्न भाऊंनी केला. थर्मल पावर स्टेशन इथे आठवा आणि नववा संच आणला जेणेकरून अनेकांना रोजगार मिळेल. आरोग्य, शिक्षण, रोजगार ही भाऊंच्या जनताकुटुंबासाठी ची त्रीसूत्री आहे.

इतकं मोठं कुटुंब सांभाळताना कधी काही गोष्टी राहूनही जातात पण बल्लारपूर, पोंभुरणा, मूल हा मतदारसंघ पूर्ण भारतातील क्रमांक एकचा कसा होईल यासाठी सुधीर भाऊ कटिबद्ध आहे. येणाऱ्या काळात महिला भगिनी आर्थिक दृष्ट्या कशा स्वावलंबी होईल या साठी सर्वतोत्तम प्रयत्न भाऊं करतील हे एक महिला म्हणून मला वाटत.

आज सातव्यानंदा जनतेच्या सेवेत रुजू होण्यासाठी भाऊ सज्ज झाले आहे. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वास आहे की, आपल्या या भावाला, आपल्या या दादाला बल्लारपूर मतदारसंघातील महिला भगिनी,सर्व आया बहिणी, सगळे तरुण मित्र आणि भाऊंच्या बल्लारपूर मतदारसंघाच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य भाऊं सोबत असेल.

“जीवन आणि मरण हा निसर्गाचा नियम आहे एक दिवस कदाचित मी नसेल पण कँसर हॉस्पिटल चालू राहील, देशासाठी सैनिक तयार होत राहतील, मेडिकल कॉलेज मध्ये हजारो रुग्ण उपचार घेत राहतील, मी निर्माण केलेल्या उद्योगात हजारो बेरोजगार तरुण काम करत राहील आणि माझ्या मुली एस.एन.डी. टी. विद्यापीठात शिक्षण घेत राहील. विकासाचा हा झरा असाच अव्याहतपणे वाहत राहिला पाहिजे” असे भाऊ बोलतात, यावरून भाऊंची दूरदृष्टी दिसून येते त्याचसोबत जनतेशी त्यांचे जे भावनिक नाते आहे ते दिसून येते. भाऊंचा सातव्यानंदा विजय पक्का आहे.मतदारसंघाच्या विकासासोबतच त्यांचे सामान्य नागरिकांशी असलेले भावनिक नाते भाऊंना सातव्यानंदा विजयाकडे घेऊन जाणारे आहे. म्हणूनच विश्वास पक्का आहे गुलाल आपलाच आहे. चलो कहे दिलसे, सुधीर भाऊ फिरसे..

*नम्रता आचार्य ठेमस्कर*
कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टी चंद्रपूर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *