By : Devanand Sakharkar
चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दि 29 ऑक्टोबर रोजी वरोरा, चिमुर व ब्रम्हपुरी विधानसभा मतदार क्षेत्रात भेट दिली. वरोरा येथील भाजप-महायुतीचे उमेदवार करण देवतळे यांच्या नामांकन रॅलीत सहभागी होवून त्यांनी विजयाचे रणशिंग फुंकले. या रॅलीमध्ये सर्वच क्षेत्रातील नागरीकांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला.
हंसराज अहीर यांनी महायुतीचे चिमुर विधानसभा क्षेत्राचे उमेदवार किर्तीकुमार भांगडीया यांची भेट घेवून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपाच्या वतीने आयोजित तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्यांच्या मेळाव्यालाही अहीर यांनी उपस्थितांना संबोधित करुन भाजपा उमेदवाराच्या विजयासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे भाजप-महायुतीचे लोकप्रिय उमेदवार कृष्णा सहारे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या रॅलीमध्येही हंसराज अहीर यांनी उपस्थिती दर्शविली. त्यांच्या नामांकन प्रसंगी सुध्दा त्यांनी विशेष उपस्थिती दर्शविली व भाजप-महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या संयुक्त बैठकिस संबोधित करुन भाजप उमेदवारास विजयी करण्याचे आवाहन केले. हंसराज अहीर यांच्या समवेत वरोरा येथे माजी आमदार ऍड. संजय धोटे, सुदर्शन निमकर व पदाधिकारी उपस्थित होते. ब्रम्हपुरी येथील बैठकीमध्ये माजी खासदार अशोक नेते व माजी आमदार अतुल देशकर यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती.
चंद्रपुर येथे दि. 29 ऑक्टोबर रोजी महेश भवन तुकुम येथील भाजपा पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुखांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस हंसराज अहीर यांनी मार्गदर्शन केले. भाजपा-महायुतीचे उमेदवार किशोर जोरगेवार यांना मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. या बैठकीस आ. किशोर जोरगेवार यांनीही संबोधित केले. कार्यक्रमास पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.