By : लोकदर्शन प्रतिनिधी
कोरपना : तालुक्यात कढोली खुर्द, आसन (खुर्द) व बोरी-नवेगाव, मायकलपूर ही चार गावे मिळून गटग्रामपंचायत अस्तित्वात आहे. अलीकडेच प्रशासनाने येथील सरपंच पदाचा तिढा सोडवून भाजपाच्या सौ. निर्मलाताई मरस्कोल्हे यांना सरपंचपद बहाल केले.त्यानिमित्त आयोजित गावभेट व विजयी संकल्प रॅली राजुरा विधानसभा निवडणूक प्रमुख देवरावदादा भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी कढोली (खुर्द) येथे जिल्हा खनिज विकास निधीअंतर्गत मंजुर झालेल्या आर.ओ. प्लांटचे भूमिपुजनही त्यांच्या हस्ते झाले.
याठिकाणी जमलेल्या ग्रामस्थांचा उत्साह व प्रतिसाद पाहून या भागातील जनतेचा कौल भाजपा-महायुती सरकारच्या बाजूने असून येत्या काळात बदल सुनिश्चित आहे, असा विश्वास यावेळी देवरावदादा भोंगळे यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संजय मुसळे, महामंत्री सतीश उपलंचिवार, अनु जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अरुण मडावी, महामंत्री प्रमोद कोडापे, विजय रणदिवे, पुरुषोत्तम भोंगळे, प्रमोद पायघन, सरपंचा निर्मला मरस्कोल्हे, उपसरपंच विनायक डोहे, पुरुषोत्तम ढेंगळे, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, भाजयुमोचे महामंत्री विशाल अहिरकर, सतीश जमदाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
कढोली खुर्द येथील सर्व भाजपा कार्यकर्ते तसेच आसन खुर्द येथील संजय आस्वले, देवराव रणदिवे, अविनाश पेटकर, कवडू मरस्कोल्हे, प्रवीण पायघन, सचिन आस्वले, सागर धुर्वे, आकाश आत्राम,अंकुश पायघण, अशोक धाबेकर, संजय जुम्नाके, सागर मत्ते, अविनाश नामपल्ले, आत्माराम धाबेकर, गणेश मुरकुटे, विनोद धुर्वे, श्रीराम नांदेकर तसेच बोरी नवेगाव येथील मोरेश्वर भोंगळे, शंकर तडस, संतोष बुटले, विजय मडावी, वासुदेव गेडाम, शामसुंदर सोयाम, गजानन पंधरे, रवींद्र कारेकर, लिंगुजी सोयाम,शालेंद्र कारेकर, आकाश आत्राम, संदीप बुटले, ईश्वर कुडमेथे, अश्विन लांडे, सुरेश कुईट, शोभाबाई कुईटे, बंडू लामटिळे, शिल्पा बुटले, निर्मला मेश्राम, संगीता तडस, रेवता कारेकर, वनिता सोयाम, मेघा रागीट, संगीता कुईटे, शत्रुघ्न मोरे, प्रभाकर बुटले, नागोबा मेश्राम आदी रॅलीत सहभागी होते.