By : Rajendra Mardane
वरोरा : वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मर्दाने यांच्या नेतृत्वाखाली येथील उप विभागीय कार्यालयासमोर ता .७ ऑक्टोबर पासून साखळी उपोषणाद्वारे संघाने केलेल्या सर्व मागण्या रेल्वे प्रशासनाच्या विचाराधीन असून त्यासंदर्भात आमोरासमोर चर्चा करण्यासाठी नागपूर येथे विभागीय रेल्वे प्रबंधकांनी येत्या १५ ऑक्टोबर रोजी बैठकीचे आयोजन केल्याने प्रवासी संघाच्या शिष्टमंडळाने यावे, असा प्रस्ताव घेऊन त्यांचे दूत विभागीय सहा. वाणिज्य निरीक्षक सुजितकुमार आणि वरोरा रेल्वे स्टेशन प्रबंधक चेतन मीना उपोषण मंडपात आल्याने त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत त्यांच्याच हस्ते फळांचे सरबत घेऊन उपोषणकर्ते राजेंद्र मर्दाने आणि बळवंतराव शेलवटकर यांनी सर्वानुमते साखळी उपोषण तूर्त स्थगित केले.
याबाबत अधिक वृत्त असे की, मागील १७ वर्षांपासून रेल्वे प्रवासी संघातर्फे विविध मागण्या करण्यात आल्या असून जनप्रतिनिधी, रेल्वेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच रेल्वेमंत्री यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही न्याय्य मागण्या मान्य होत नसल्याने ता. ७ ऑक्टोबर २४ पासून साखळी उपोषण सुरू होते. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना वरोरा येथे थांबा द्यावा, कोरोना संक्रमण काळात बंद केलेल्या रेल्वे गाड्या पुन्हा सुरू कराव्या, बल्लारशाह ते पुणे व मुंबईसाठी दररोज एक्सप्रेस गाडी सुरू करण्यात यावी, बल्लारशाह ते नागपूर, वर्धा, अमरावती,शेगांवसाठी इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करावी, बल्लारशाह ते हावडा नवीन एक्सप्रेस सुरू करावी,वरोरा रेल्वे स्थानकावर डिस्प्ले बोर्ड, पोजिशन इंडिकेटर लावावे, स्वयंचलित पायऱ्या व लिफ्टची सोय व्हावी, वरोरा स्टेशनच्या पश्चिमेस नवीन तिकीट घर सुरू करावे, स्टेशनवर दुसरा फुट ओव्हर ब्रिज बनविण्यात यावा , नागपूर – जबलपूर एक्सप्रेसचा विस्तार बल्लारशाहपर्यंत करावा, बल्लारशाह ते वर्धा मेमु सायंकाळी सहा ऐवजी साढे सहा वाजता सोडण्यात यावी, अशा एकूण १२ मागण्या करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने गाड्यांना थांबे तर दिले नाहीच उलट ज्या गाड्या सुरू होत्या त्याही बंद करण्याचा उद्दामपणा केला. त्यामुळे जनतेत आक्रोश आहे. परिसरात कोळसा खाणी, आयुध निर्माण, एमआय.
डी.सी.,वेगवेगळ्या कंपन्यांचे जाळे असून त्याठिकाणी काम करणारे कर्मचारी, मुंबई-पुणे, चेन्नई, बंगलोर येथे उच्च शिक्षणासाठी असणारे विद्यार्थी, मंत्रालयात कामानिमित्त जाणारे सर्वसामान्य व्यक्ती, व्यापारी यांची ससेहोलपट होत असून प्रवाशांना बसचा प्रवास आर्थिकदृष्ट्या न परवडणारा,वेळखाऊ असल्याने शारीरिक, मानसिक त्रास होत आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर रेल्वे प्रवासी संघाच्या न्याय्य मागण्या मान्य होणे आवश्यक आहे.
नवरात्र उत्सव, दसरा तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन असल्याने प्रशासनावर तसेच पोलीस यंत्रणेवर ताण असल्याची जाणीव असल्याने आडमुठे धोरण न स्वीकारता रेल्वे प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आमरण उपोषणाचा निर्णय स्थगित ठेवल्या गेला आहे,असे राजेंद्र मर्दाने यांनी सांगितले.
विशेष म्हणजे या आंदोलनाला राष्ट्रीय सामाजिक न्याय कृती मंच (रजि.),राष्ट्रीय पातळीवर कार्यरत जय हिंद सैनिक संस्था,लाल बहादूर शास्त्री सोशल फोरम ऑफ महाराष्ट्र, अ.भा.अ.जा. युवजन समाज, आंबेडकर – वाल्मिकी वेल्फेअर समिती, मनसे वाहतूक संघटना, वरोरा व्यापारी असोसिएशन, महाराष्ट्र मानवाधिकार संघ, वरोरा, रोटरी क्लब ऑफ वरोरा, पत्रकार सुरक्षा समिती चंद्रपूर जिल्हा, वरोरा अधिवक्ता संघ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट वरोरा तालुका, शिवसेना शिंदे गट चंद्रपूर जिल्हा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नागपूर प्रदेश, विविध स्वंयसेवी संस्था, संघटना इ. नी पाठिंबा घोषित केला होता.
सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून साखळी उपोषण करणारे प्रवीण गंधारे, खेमचंद नेरकर, विवेक बर्वे, गजानन उमरे, मारोतराव मगरे,शाम ठेंगडी, प्रकाश पोहाणे,अशोक बावणे, मयुर दसुडे, विलास दारापूरकर, योगिता लांडगे, मनिषा लोणगाडगे व पाठिंबा देणारे अधिवक्ता पुरुषोत्तम सातपुते, गजानन बोढाले, जयंत ठाकरे, विनोद हरले, सुनील नामोजवार, विविध राजकीय संघटनेचे पदाधिकारी नितीन मत्ते, रमेश राजूरकर, करण देवतळे, दत्ता बोरेकार, बाबा भागडे, बंडू लभाने, राजू कुकडे, वैभव डहाणे, सिद्धार्थ सुमन, शेख जैरूद्दीन छोटुभाई, मधुसूदन टिपले, गजानन राऊत, सनी गुप्ता, मुजम्मील मजीद शेख, सरपंच कैलास कुमरे, सामाजिक कार्यकर्ते व स्वंयसेवी संघटनेचे पदाधिकारी मसेस आनंदवनाचे विश्वस्त सुधाकर कडू, शंभूनाथ वरघने, बंडू देऊळकर, सुनंदा पिदुरकर, संगीता गोल्हर, वंदना दाते, डॉ. विवेक तेला, किशोर डुकरे, अक्षय भिवदरे, प्रवीण धनवलकर, रामदर्शन गुप्ता, शुभम गवई, राहील पटेल, सुनील अनारकर, विनोद बिरीया, किशोर उत्तरवार, समीर हक्के, खंडाळकर, गणेश कुंभारे, दि.रा.रामगुंडमवार, संजू राम, संदीप गांधी, राजेश साकुरे, रवींद्र नलगिंटवार, गणेश गहूकार, पवन संचेती, दिनेश कवळे, डॉ.मनोहर वेळेकर, डॉ.आशिष देवतळे,पत्रकार सोमेश्वर येलचेलवार, बाळू भोयर, प्रदीप कोहपरे, रवी भोगे, परमानंद तिराणिक, जितेन्द्र चोरडिया, प्रवीण कडू, राहुल देवडे, विजय वैद्य, प्रवीण सुराणा, बबलू रॉय, जगदीश तोटावार, सुधीर खापने, योगेश खिरटकर, शाहिद अख्तर, शरद नन्नावरे, राजेश ताजने, हितेंद्र तेलंग, डॉ. प्रवीण मुधोळकर, हरीश केशवाणी, भास्कर गोल्हर, तुषार मर्दाने, सुरेन्द्र चौहान, संजय गांधी, जुबेर कुरेशी, सागर कोहळे तसेच उत्तम सहकार्य करणाऱ्या पोलीस यंत्रणेबद्दल संघाने कृतज्ञता व्यक्त केली आहे.