मानवी मूल्य जपत विज्ञानाधारित विकास व्हावा : आ. सुभाष धोटे

By : उद्धव पुरी 

गडचांदूर : येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स मध्ये दिनांक ५ऑक्टोबर २०२४ रोज शनिवारला National Conference on Frontiers in Science & Technology (NCFIST -2024) या विषयावर एक दिवसीय विज्ञान परिषद आयोजित करण्यात अली होती. विज्ञानाच्या आधारेच विकास साधता येतो मात्र मानवी मूल्याची जपवणूक करूनच हा विकास व्हायला हवा, असे प्रतिपादन उदघाटन सत्राचे अध्यक्ष मा.श्री.सुभाषभाऊ धोटे आमदार राजुरा विधानसभा व अध्यक्ष, गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडल गडचांदूर यांनी व्यक्त केले. या परिषदेचे उदघाटन डॉ. अनिल चिताडे, अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी केले. याप्रसंगी गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर चे सचिव मा.श्री. धनंजयजी गोरे सहसचिव मा. श्रीमती उज्वलाताई धोटे उपस्थित होते. ही विज्ञान परिषद अल्ट्राटेक सिमेंट कंपनी यांच्या सहकार्याने घेण्यात आल्याने कंपनी चे जॉईंट प्रेसिडेंट व युनिट हेड मा. श्री.अतुल कंसल व सिनिअर वाईस प्रेसिडेंट व एच. आर हेड मा.श्री. मुकेश गहलोत यांनी मार्गदर्शन केले. विज्ञानाच्या विविध पैलूचा वापर करूनच गडचांदूर येथील वाढता धूर रोखल्या जाऊ शकते. असे त्यांनी सांगितले. सर्व पाहुण्यांचे स्वागत करून महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा प्राचार्य, डॉ. शैलेंद्र देव सर यांनी सादर केला. तर कार्यक्रमाची प्रस्तावना संयोजक डॉ संदीप घोडीले संचालन डॉ. उत्कर्ष मून व शेवटी आभार प्रदर्शन ग्रंथपाल प्रा. मनोहर बांदरे यांनी केले.
जवळपास २५० संशोधकांनी परिषदेसाठी आपली नोंदणी केली असून २० संशोधकांनी पेपर प्रस्तुतीकरण व तितक्याच लोकांनी पोस्टर प्रस्तुतीकरण केले. सदर परिषदेसाठी मुख्य वक्ता म्हणून प्रा.डॉ. सुरेश उमरे (VNIT नागपूर) व डॉ. के. पी. राघवेंद्र वरिष्ठ वैज्ञानिक(ICAR – CICR Nagpur ) हे हजर होते. समारोपीय कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मोहन गिरिया सर, प्राचार्य, चिंतामणी कॉलेज गोंडपिपरी,डॉ. पी.डी. शोभणे,सिम्बायोसिस विद्यापीठ,नागपूर व मा. रीना शिंदे, गुणवत्ता नियंत्रण कक्षाच्या मुख्य अल्ट्राटेक कंपनी, गडचांदूर हे हजर होते. समारोपीय कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्त्यांच्या मार्गदर्शनानंतर प्रथम १.राजेश कुमार, नागपूर, द्वितीय संदीप पारखी व तृतीय पारितोषिक राहुल मापारी या तीन संशोधकांना बेस्ट पेपर प्रेसेंटेशन तसेच विष्णवी पिदडी,जावेद शेख याना अनुक्रमे बेस्ट पोस्टर प्रेसेंटेशन अवॉर्ड देण्यात आले. राष्ट्रीय स्तरावरील या परिषदेला मदत करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपणारे दाते सुद्धा समोर आलेत. त्यामध्ये उल्ट्राटेक सिमेंट कंपनी गडचांदूर, बँक ऑफ महाराष्ट्र राजुरा, स्वस्तिक केमिकल्स नागपूर, इन्फन्ट जीजस राजुरा, मॉडर्न सायंटिफिक नागपूर, चिंतामणी ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट बल्लारपूर,श्री वेंकटेश बहुउद्देशीय संस्था, गडचांदूर व भद्रावती शिक्षण मंडळ भद्रावती यांचा समावेश आहे.
या परिषदेला वेगवेगळ्या विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. परिषदेच्या यशस्वीतेसाठी गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी यांचे प्रोत्साहनामुळे विज्ञान परिषद यशस्वी झाली. प्रा. डॉ. अनिस खान, प्रा. पवन चटारे, प्रा.रामकृष्ण पटले प्रा. चेतन वानखेडे, प्रा. मनोहर बांदरे, डॉ. अजयकुमार शर्मा, प्रा. चेतन वैद्य, प्रा. अक्रम शेख, कु.रेणू गानफाडे, कु. प्रियंका मोहारे व कु. शबाना शेख, तसेच श्री. सुभाष गोरे, श्री. शुभकान्त शेरकी, श्री.प्रशिक करमनकर, श्री. बबन पोटे, श्री. सुयोग्य खोब्रागडे, श्री. संजय पिंपळकर. श्री. यशवंत मांडवकर, श्री. भास्कर मेश्राम, श्री.रमेश मांडवकर, श्री. अरुण मेंढी, श्री. रुपेश मेश्राम, श्री. शिवशंकर दुबे या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *