सेवानिवृत्त शिक्षिका माया राजूरकर यांना ‘विद्या वाचस्पती सारस्वत सन्मान’

By : Rajendra Mardane 

चंद्रपूर : वरोरा येथील सामाजिक कार्यकर्त्या तसेच सेवानिवृत्त शिक्षिका माया रमेश राजुरकर यांना त्यांनी केलेल्या विविध सामाजिक तसेच शैक्षणिक कार्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय हिंदी विद्यापीठाद्वारे ‘विद्या वाचस्पती सारस्वत सन्मान’ पदवीने सन्मानित करण्यात आले.
दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठाच्या कुलपती डाॅ. इंदू भूषण मिश्रा यांच्या हस्ते ही पदवी बहाल करण्यात आली. यावेळी रानी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विश्वविद्यालय झांसीच माजी कुलपती पद्मश्री डाॅ. अरविंद कुमार, प्रमुख वक्ते दीपा मिश्रा तसेच मार्गदर्शक शिवाजी शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here