लोकदर्शन नवी दिल्ली/मुंबई प्रतिनिधी-👉गुरुनाथ तिरपणकर
ग्राहकांना बक्षिसे विक्रेत्यांना रोजगार सरकारला महसूल आणि रेल्वेला भाडे देण्याची योजना असून त्यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकांवर लॉटरी विक्रेत्यांना स्टॉल मिळावा! यासाठी महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेने थेट नवी दिल्लीत धडक दिली असून लवकरच रेल्वे स्थानक तिथे लॉटरी स्टॉल दिसणार आहे!
महाराष्ट्रातील एस.टी स्थानकांप्रमाणे आता रेल्वे स्थानकांवरही अधिकृत लॉटरीच्या स्टॉलला परवानगी मिळणार असून लॉटरी विक्रेत्यांचे जेष्ठ नेते श्री विलास सातार्डेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले.
गाव तिथे एस.टी आणि एस.टी स्थानक तिथे लॉटरी स्टॉल या संकल्पनेला पूर्णरूप मिळाल्यानंतर आता लवकरच रेल्वे स्टेशन तिथे लॉटरी स्टॉल हा नवा संकल्प गतीने आकाराला येणार असून महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेला राज्यातील एस.टी स्टॉल च्या प्रचंड यशानंतर आता राजधानी नवी दिल्लीत रेल्वे मंत्रालयापर्यंत त्यासाठी बाजी मारली आहे.
लॉटरी विक्रेत्यांचे नेते श्री विलास सातार्डेकर यांनी गेली काही वर्षे पाठपुरावा करून महाराष्ट्रातील एस.टी स्थानकावर लॉटरी स्टॉल करीता मंजुरी मिळवली त्यासाठी सातत्याने प्रशासनाला जाग केले आणि एस.टी आगारात आता लॉटरीला हक्काचे घर मिळाले. हजारो बेरोजगारांना रोजगार आणि कुटुंबाना आधार मिळाला त्या मागोमाग आता प्रत्येक रेल्वे स्थानकांवर लॉटरी स्टॉलची जोरदार मागणी थेट रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे करण्यात आली असून मुंबई ते दिल्ली अशी चक्रे फिरू लागली आहेत. पश्चिम रेल्वेचे महा व्यवस्थापक श्री नीरज वर्मा आणि मध्य रेल्वेचे महा व्यवस्थापक श्री रजनीश गोयल यांच्याशी या संदर्भात पत्र व्यवहार सुरू झाला असून रेल्वे मंत्रालयातील वरीष्ठ अधिकारी आणि लॉटरी संघटनेचे पदाधिकारी पाठपुरावा करीत आहेत लवकरच एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.
एस.टी स्टॉल प्रमाणे रेल्वे स्टॉलवरही लॉटरी विक्री केंद्र उभे असेल अशी आशा लॉटरी विक्रेता संघटनेचे जेष्ठ नेते श्री विलास सातार्डेकर यांनी व्यक्त केली. या संदर्भात पुन्हा एकदा लवकरच लॉटरी संघटनेचे शिष्टमंडळ रेल्वे मंत्रालयात चर्चेसाठी जाणार आहे.