पडवी, पडवीपठार येथे नवसाला पावणारा श्री. काळभैरव मंदिराचे अलौकिक रुप*

 

लोकदर्शन मुंबई प्रतिनीधी:👉 महेश कदम

डोंगराच्या कुशीत, गर्द झाडीत असणारे काळभैरवाचे हे एक स्थान.आठ दिशांची आठ प्रहरी राखण करणारा हा रक्षणकर्ता, जणू या गावाची इथे नाकेबंदी करूनच उभा आहे. नवसाला पावणारा काळभैरव याची महाड तालूक्यात श्रद्धा आहे पडवी व पडवीपठार गाव सैनिकाचे गाव असून बरचसे तरूण सैन्यात असून कित्येक लोक रिटायर्ड झाले आहेत सर्वाची या ग्रामदेवतेमूळे आम्हावर कोणतेही संकट येत नाही व या देवाच्या कृपेनेच आम्ही भरती होतो व सूखरूप परत येतो अशी भावना आहे . आवरातील भग्न अवशेष त्याच्या पुरातन अस्तित्वाची साक्ष देत आहेत. एका बाजूला मायबाप सह्याद्री पूर्व दिशेकडून साद घालत असताना, हे मंदिर दक्षिणाभिमुख असल्याचे प्रयोजन काही समजत नाही. जिर्णोध्दार केलेल्या या मंदिर प्रांगणात असणाऱ्या एका मारुती मुर्तीवर सुबक अशी छत्री बांधून त्यावर रंगरंगोटी केली आहे. आवारात इतरस्त्र जुन्या बांधकामाला वापरलेले दगड पसरले आहेत. तसेच आवारात जुनी-नवी थडगी सुद्धा आहेत.
बाजूलाच या मंदिराचे वेगळेपण सांगणारी एक गजांतलक्ष्मीची एक मूर्ती लक्ष वेधून घेते.( गजांतलक्ष्मी शिल्पे ही खूप कमी ठिकाणी पहायला मिळतात) महाड-पुणे रस्त्यावरील वरंध गावातून पडवी पठाराला जाणारा फाटा आहे. या फाट्यावरून पूल ओलांडून कुंभारकोंड गावात दोन फाटे लागतात. उजवीकडे गेल्यास वरंधच्या ‘अभिनव शिवथरघळला’ जाता येते आणि डावीकडे जाणारा रस्ता पठारावर घेऊन जातो. छोटासा घाट चढल्यावर दिसणारे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे.
पडवी पठार ते रामदास पठार यांच्या मधे उष्ण कटीबंधीय जंगलाचा सदाहरित पट्टा आहे. यात वेगवेगळे औषधी गुणधर्म असणाऱ्या असंख्य वनस्पती आहेत. वन्य पशु-पक्षी अधून मधून झलक देऊन जातात.
दुर्दैव असे की ६०-७० उंबऱ्याच्या या गावात वाहतूक सुविधा जवळपास नाहीच. तसेच एका बाजूला कोपऱ्यात असल्याने इतर वाहतूकीची वानवा आहे. घाटातील रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे. स्थानिक लोकं सुमारे ५ किमी ची पायपीट करून बाजरासाठी वरंध गावात येतात. रामदास पठार ते पडवी पडवी पठार हा माळावरून २ किमी चा रस्ता व्हावा आणि रामदास पठारला येणारी बस पडवी पठारला यावी अशी स्थानिक लोकांची मागणी आहे याकरीता हनूमान विकास मंडळ मूंबई यानी नूकतेच मा. मूख्यमंञी महोदयांना निवेदन दिले होते व मागील काही दिवसापूर्वी आपले पालक मंञी ऊदय सामंत यांची भेट मंडळाच्या पदाधिकारी यांनी घेतली त्याची फलश्रृती निधी मंजूर होत आहे गावकरी व मूंबई मंडळ यांचे अभिनंदन. अशी माहिती स्थानिक रहिवासी चंद्रकांत साळुंके यांनी दिली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *