ए.पी.बी.एस. थिएटर ग्रुप बल्लारपूर यांनी सादर केलं नाटक बडे भाई साहब ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन बल्लारपूर -👉प्रा.अशोक. डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
मोठ्या भावाची धाकट्या भावाप्रती असलेली जबाबदारी आणि प्रेम हे मोंटफोर्ट स्कूल मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बडे भाई साहब’ या हिंदी नाटकात रंगमंचावर पाहायला मिळाले. भाऊ-भावाचं नातं खूप खास असतं. यामध्ये प्रेमासोबतच वैराग्यही आहे. मोठा भाऊ नेहमी धाकट्यावर हुकूमत गाजवतो आणि धाकटा भाऊही नाराज होऊन कधी कधी त्याच्यावर सूड उगवतो. त्यानंतर काय होते, ही पाहण्याची आणि विचार करण्याची बाब आहे. सोमवारी सकाळी मोंटफोर्ट येथील मंचावर काही असेच पाहायला मिळाले. ए.पी.बी.एस. थिएटर ग्रुप बल्लारपूर व मोंटफोर्ट हायर सेकेंडरी स्कूल द्वारा आयोजित नाटय शिबिर कार्यक्रमात इयता ५ वी ते ९ वी च्या एकून २८ मुला-मुलींनी सहभाग घेतला. अवघ्या १० दिवसांत विद्यार्थांनी नाटक अभिनय, संगीत व नृत्य कला आत्मसात केली. मुंशी प्रेमचंद यांच्या कथेवर आधारित हिंदी नाटक बडे भाई साहब सादर करण्यात आले. या नाटकाचे दिग्दर्शन व बडे भाई साहब या पात्राची भूमिका अनिकेत परसावार यांनी साकारली. छोटे भाई यांच्या भूमिकेत वंश नरांजे व बाकी सर्व मोंटफोर्ट स्कूल मधील कलाकार विदयार्थी आणि शिक्षकांच्या भूमिकेत होते. या नाटकाचे संगीत रजनी वाळके म्याम व नृत्य दिग्दर्शन राजेश कैथवास सरांनी केलं. या कार्यक्रमाच्या आयोजन मोंटफोर्ट स्कूलचे मुख्याध्यापक ब्रदर प्रेम कुमार यांनी केलं. हे नाटक बघण्यासाठी मोंटफोर्ट स्कूल मधील विद्यार्थी, शिक्षक व कलाकारांचे आई-बाबा उपस्थित होते. अभिनय, संगीत, नृत्य अशा संपूर्ण कलागुणांनी हा परिपूर्ण नाटक प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडून गेला. असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिग्दर्शक अनिकेत परसावार यांनी सांगितले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *