By : Shankar Tadas
राजुरा :
राजुरा शहरातील श्री मधुकर टेकाम यांचे चिरंजीव अभिजीत टेकाम याला परदेशातील उच्च शिक्षणासाठी आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या अर्थसहाय्याने ५२ लक्ष ७४ हजार ६७ रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे.या शिष्यवृत्तीमुळे लंडन येथील युनिर्व्हरसिटी ऑफ शिफिल्ड (यू.के.) मधून त्याला मास्टर ऑफ साइन्स इनबायोडायव्हर्सिटी अॅण्ड कन्झर्व्हेशन या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यास मदत होणार आहे.
श्री अभिजित मधुकर टेकाम यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेत माजी आमदार अँड. संजयजी धोटे यांनी पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देत त्याचे भारतीय जनता पक्ष राजुरा च्या वतीने मनपुर्वक अभिनंदन केले.
राजुरा शहरातील युवक विदेशात जावून आपल्या शहराचे नाव लौकिक करित शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त करेल हि बाब आपल्यासाठी कौतुकास्पद आहे असे म्हटले.
या वेळी राजुरा शहरातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी श्री.सतिश धोटे, श्री.महादेव तपासे , श्री दिलिपजी वांढरे श्री. सदिप पारखी, श्री.सचिन शेन्डे, श्री. जनार्धन निकोडे, श्री. तुलाराम गेडाम, श्री. राजु गौरशेट्टीवार,श्री.सुरेश कल्लपल्लीवार आदीउपस्थित होते.