गडचांदुरात मोटर सायकल चोरीचे सत्र सुरुच, दोन-अडीच महिन्यात 15 पेक्षा अधिक गाड्यांची चोरी, खुपिया विभाग कुचकामी!!

 

लोकदर्शन गडचांदूर, 👉अशोककुमार भगत

कोरपणा तालुक्यातील औध्योगिक नगरी म्हणून ओळखन्यात येणार्या गडचांंदूर या नगरात गेल्या दोन-अडीच महिन्यात सुमारे 15 पेक्षा अधिक दूचाकिं चोरीला गेल्या. यापैकी एकाही गाडीचा शोध लावण्यास गडचांदूर पोलीसांना यश आले नसल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण ज़ाले आहे.

गडचांदूर या औध्योगिक नगरात दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो. कोरपणा तालुक्यात हे मध्यवरती ठिकाण असल्याने येथे तालुक्यातील किमान 50 गावातील ग्राहक येत असतात. त्यामुळे स्थानिकसह राजूरा,बल्हारपुर,चंद्रपूर येथील व्यापारी मोठ्या सन्खेने येतात. परिणामी या आठवडी बाजारात दिवसभरात किमान 10 ते 15 हजाराच्या घरात ग्राहकांची गर्दी उसळलेलि असते. यात दुचाकी ग्राहकांची मोठी सन्क्या बघता नेमके चोरट्याचे फावते. अलीकडे या चोरट्यानी दुचाकी चोरीचा नुसता सपाटाच लावला आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यात सुमारे 15 पेक्षा अधिक दुचाकी चोरीला गेल्याची माहिती आहे.

गेल्या मंगळवारी (24)बाजारातही 3 दुचाकी चोरीला गेल्याचे समजते. मात्र, पोलीसानी केवळ दोनच गाडीची चोरी ज़ाल्याचे सांगितले. यापूर्वी चोरीला गेलेल्या गाडीचा शोध लागला नसताना पुन्हा दुचाकी चोरीचे सत्र सुरुच असल्याने गडचांदूर पोलिसांची कार्यक्षमताच आता पोलिस अधिक्षकांनी तपासण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे.

गडचांदूर ठाण्यातही पोलिसांची खुपिया शाखा आहे. तथापि, चोरीला गेलेल्या दुचाकीच काय, त्याबाबतचा सुगावा लावण्यासही ते अपयशी ठरल्याचे दिसते. गेल्या 10 दिवसात माणिकगढ सिमेंट कंपनी गडचांदूर आणि शेजारच्या आवारपुर सिमेंट उद्योगातील वसाहतीतील 8-10 सदनिका फोडून दिड करोड रुपये किमतीचे सोने व रोख राशी चोर्ट्याणि लंपास केली. ह्यचाही शोध घेण्यास अद्याप गडचांदूर पोलीसांना यश आले नाही. तत्पूर्वी बालाजी नगरितुन एल्युमीनियम तारांचे चे पाच बंडल चोरीला गेले होते. त्याची किंमत 3 लाखावर असल्याचे महादेव हेपट या तारमालकाने सांगितले. या चोरीचा सुगावाही अद्याप लागला नाही.

गडचांदूर या मलाईदार टाऊन ला दोन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दर्जाचे आणि दोन-तिन शिपाई तैनात केले आहेत. मात्र गडचांदूरात सुरु असलेल्या कथित अवैध दारू, अवैध सुगंधित तंबाखू विक्री आणि सट्टापट्टिची वसुली करण्यातच हे कर्मचारी गुंतले असल्याचा गावकरयाँचा गम्भीर आरोप आहे. जनतेच्या जानमालाचे रक्षण करण्यासाठी नेमलेली यंत्रनाच जर अपयशी ठरत असेल तर आम जनतेने दाद कुणाकडे मागायची, असा सवाल विचारला जात आहे. वरिष्ट पोलिस अधिकार्याणी याकडे लक्ष पुरवने आता गरजेचे ज़ाले आहे.
——————————————–
——————————————–
पैट्रोलपंप चौक ते माणिकगढ सिमेंट द्वार पर्यंतच्या सार्वजनीक मार्गावर दुतर्फा सिमेंटची मालवाहू वाहने रस्त्यावर उभी रहायची. त्यामुळे नेहमी छोटे-मोठे अपघात घडत होते. याबाबत नगरसेवक विक्रम येरने यांनी अनेकदा निवदने दिलीत. मात्र पोलिस प्रशासन ढिम्मच होते. दरम्यान गडचांदूर भाजप चे अद्यक्ष अरविंद ड़ोहे यांनी मोर्चा काढून निर्वाणीचा ईशारा दिला. लगेच ठाणेदारांनी वाहतूक शिपायांना निर्देश देवून ही समश्या निकाली काढली, हे विशेष!
——————————————–
‐——————————————-
CC TV तपासनितून चोरट्यांचा लवकरच छडा लागेल- ठाणेदार शिवाजी कदम.
याबाबत गडचांदूर चे ठाणेदार शिवाजी कदम याना भ्रमणध्वनिवर विचारणा केली असता बाईक चोरीचा लवकरच छडा लागणार असल्याचे सांगितले. आठवडि बाजारात नविन CCTV बसवण्यात येनार आहेत. याशिवाय बाजारलगत बाहेरील व्यापार्याची वाहने ठेवण्यास मज्ज्वाव करण्यात येईल. जेणेकरुन चोरट्यावर व बाईकवर नजर ठेवण्यास सोपे जाईल. आवारपुर आणि माणिकगढ वसाहतितील चोरी प्रकरणी CCTV फुटेजनुसार तपास चालू असल्याची माहितीही ठाणेदारांनी यावेळी दिली.
‐——————————————-
——————————————–

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *