कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित : कढोली खुर्द येथील अवैध सरपंच निवड भोवली

By : Shankar Tadas
कोरपना : कढोली खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह दोन सदस्य अपात्र झाल्यानंतर त्यांच्या अपिलाची 15 दिवसांची मुदत असताना त्यापूर्वी सरपंच निवड सभा घेऊन नवीन सरपंच निवड करण्यात आली होती. त्यामुळे उपसरपंच डॉ. विनायक डोहे यांनी भाजपा राजुरा विधानसभा प्रमुख देवरावदादा भोंगळे यांच्या मार्फत पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार देऊन कोरपना तहसीलदार यांनी लावलेली सरपंच निवड सभा रद्द करावी तसेच तहसीलदार यांना त्वरित निलंबित करावे अशी मागणी केली होती. या तक्रारीची राज्य शासनाने दखल घेत कोरपना तहसीलदार यांना 27 सप्टेंबर 2024 रोजी निलंबित केले आहे.
डॉ. विनायक विठ्ठलराव डोहे, उपसरपंच कढोली खुर्द यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले होते की,
‘ग्रामपंचायत कढोली खुर्द ता. कोरपना जि. चंद्रपूरच्या सरपंच सौ. निर्मला कवडू मरस्कोल्हे आणि सदस्य सौ. सीताबाई पंधरे यांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशानुसार 12 ऑगस्ट 2024 रोजी अपात्र ठरविण्यात आले होते. या आदेशाविरुद्ध विभागीय आयुक्त, नागपूर यांच्याकडे दाद मागण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार 26 ऑगस्ट रोजी नागपूर येथे सुनावणीचे पत्र तहसीलदार यांच्यासह संबंधित सर्वाना देण्यात आले होते. तरीही तहसीलदार यांनी 19 ऑगस्टला दिलेल्या आदेशानुसार सरपंच निवडीकरिता 26 ऑगस्ट 2024 रोजी सभा घेतली व काँग्रेसचे उमाजी आत्राम यांची सरपंचपदी निवड केली. अपिलाची मुदत 15 दिवस म्हणजे 27 ऑगस्ट पर्यंत असताना ती संपायच्या आत ही सभा घेण्यात आली आहे. तहसीलदार कोरपना यांनी पैसे खाऊन, एकतर्फी आदेश काढून घाईने सभा घेतल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच सदर सरपंच निवड रद्द करावी.”
या तक्रारीची दखल घेत तहसीलदार कोरपना यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *