,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन देउळगावराजा 👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
देऊळगाव राजा शहरातील मुस्लीम बांधवानी ईद-ए-मिलाद मोठ्या उत्साहाने हिंदू मुस्लीम एकोप्याने साजरी केली, मुस्लिम बांधवांनी शहरातून जुलूस काढून सण साजरा केला. यावेळी लहान मुले, मुली पुरुष मोठ्या संख्येने जुलूसमध्ये सामिल झाले होते.
हा दिवस मुस्लिम बांधवांसाठी अतिशय खास असतो. कारण या दिवशी इस्लाम धर्माचे सर्वात लोकप्रिय संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म झाला आहे. इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती अल्लाहचे प्रेषित होते. इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने कुराण हा धर्मग्रंथ त्यांच्यामार्फत लोकांपर्यंत पोहचवला. अतिशय उत्साही वातावरणात, शांततेत तकीया मथारसा मधून निघून जुना जालना रोड ,चिखली रोड ,भवानी वेस, जुनी नप वाचनालय, क्रांतीसुर्य महात्मा फुले चौक ते खुटपांइन्ट दरकत मजीद मधे समारोप करण्यात आला,यावेळी मा, माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर , पोलिस निरीक्षक संतोष महल्ल्ये,डा गणेश मांन्टे ,, डा सुनील कायंदे ,गोवींदराव झोरै ,वसंताप्पा खुळे ,सुरज गुप्ता, राजीव इंगळे,सुषमा राउत ,विनोद जैसवाल , भालेराव सर व ईतर तसेच श्रीगणेश उत्सव प्रोत्साहन समिती चे अध्यक्ष राजेश भुतडा व पदाधिकारी यांच्या वतीने मुस्लीम बांधवाणा शुभेच्छा देण्यात आल्या व सत्कार करण्यात आला, पवीञ जल्लूस मधे हाजी याकूब सेठ ,शौकत माई सेठ, सिद्दीक सेठ, जनता सेवा , गहाजी कपूर हाजी नजीर भाई लतीफ भंडारी साबीर मौलाना अशरफ पटेल मुशीरखान कोटकर काशीप कोटकर शेख अकीप शाकीर लाला सत्तारखा पठान जावेद पठान शाहिद पटेल व ईतर .बहूसंख्येने पुरूष तरुण लहान मुले, मुली सहभागी झाले होते .यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेउन सहकार्य केले